
चालू घडामोडी 05, डिसेंबर 2024 | हार्नबिल महोत्सव | Hornbill Festival 2024
![[ Hornbill Festival, Dhanesh pakshi, Hornbill mahotsav, Hornbill utsav kontya rajyacha ahe, Hornbill utsav kadhi asto, Hornbill utsavache mahatva, Hornbill bird, Hornbill Festival theme, land of festival, utsavanchi Bhumi, Nagaland festival, Nagaland chi rajdhani, Kohima konachi rajdhani ahe, seven sister mhanje Kay, rajya ani tyanchi San, kala ani sanskruti, arts and culture notes, rajya ani dance, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/HORNBILL-FESTIVAL-2024-NAGALAND_1733585299201.webp)
हार्नबिल महोत्सव 2024
Hornbill Festival 2024
Subject : GS - कला आणि संस्कृती - राज्य आणि उत्सव
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी डिसेंबर महिन्यात हार्नबिल महोत्सव (Hornbill Festival) खालील पैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ? (पोलीस भरती , SSC 2020)
1. नागालँड
2. आसाम
3. मेघालय
4. अरुणाचल प्रदेश
उत्तर : नागालँड (Nagaland)
बातमी काय आहे ?
हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
हॉर्नबिल फेस्टिव्हलबद्दल परिक्षेच्या दृष्टीने IMP वनलाईनर पॉईंट्स :
हॉर्नबिल फेस्टिव्हल केव्हा आणि कोठे आयोजित करण्यात येतो ?
• नागालँड सरकार द्वारे आयोजित दहा दिवसांचा वार्षिक पर्यटन प्रचार कार्यक्रम आहे.
• दरवर्षी 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत नागालँड मध्ये हॉर्नबिल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
• नागालँडची राजधानी कोहिमाच्या दक्षिणेस 12 किमी अंतरावर असलेल्या किसामा हेरिटेज गावात हा सण साजरा केला जातो.
या सणाला हॉर्नबिल फेस्टिव्हल असे का म्हणतात ?
• या सणाला “इंडियन हॉर्नबिल” या पक्ष्याचे नाव देण्यात आले आहे, जो राज्यातील बहुतेक जमातींच्या लोककथांमध्ये प्रदर्शित केला जातो.
• इंडियन हॉर्नबिल या पक्षाला धनेश असे म्हटले जाते.
• पूर्वीपासून नागा लोक धनेश या पक्षाला जंगलाचा राखणदार मानत आले आहेत.
• त्याची शिंगाच्या आकाराची चोच आणि काळी-पांढरी लांबलचक पिसे यांना नागा संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हॉर्नबिल फेस्टिव्हलची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?
2000 मध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली.
हॉर्नबिल फेस्टिव्हलचा उद्देश काय आहे ?
हॉर्नबिल फेस्टिव्हल का साजरी करतात ?
या उत्सवाचा उद्देश आंतर-आदिवासी परस्परसंवादाला चालना देणे आणि नागालँडचा वारसा जतन करणे, समकालीन आणि पारंपारिक एकता आणि एकात्मता निर्माण करणे.
हॉर्नबिल फेस्टिव्हलचे प्रमुख वैशिष्ट्य काय ?
• महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील 17 प्रमुख जमातीं एकाच व्यासपीठावर येऊन त्यांची लोकनृत्ये, विधी, पारंपारिक पोशाख, संगीत आणि संस्कृतीचे प्रदर्शन करतात.
• त्यामुळे हॉर्नबिल फेस्टिव्हलला नागालँडमध्ये "उत्सवांचा उत्सव" असेही म्हटले जाते.
हॉर्नबिल फेस्टिव्हल 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"कल्चरल कनेक्ट" ही हॉर्नबिल फेस्टिव्हलची यंदाची थीम आहे.