महाराष्ट्रात पुन्हा एकदा 2 उपमुख्यमंत्री
Deputy CM of Maharashtra 2024
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांपैकी योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा ?
अ) घटनेच्या कलम १६४ मध्ये राज्य सरकारच्या स्थापनेचा उल्लेख आहे.
ब) उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे.
क) श्री अजितदादा पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. अ आणि ब बरोबर
3. अ आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ आणि क बरोबर
उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही.
उपमुख्यमंत्री पद आणि त्या संदर्भात भारतीय राज्यघटनेतील तरतूदी यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• महाराष्ट्रात श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
• वास्तविक पहाता या उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही संविधानिक आधार नाही.
• घटनेत उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान या पदाचा उल्लेख देखील नाही.
राज्य सरकारा बाबत संविधान काय सांगते ?
• घटनेच्या कलम 164 मध्ये राज्य सरकारच्या स्थापनेचा उल्लेख आहे.
• कलम 164 नुसार राज्यपाल विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवडतात.
• आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्री निवडले जातात.
उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही
• ज्याप्रमाणे भारताच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपती पद, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, त्यांचे काम, उपराष्ट्रपतींचे वेतन, भत्ता, कार्यकाळ यांचा उल्लेख आहे.
• भारताच्या राज्यघटनेत तसा कुठेही उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान या नावाचा उल्लेख नाही.
• त्यामुळे उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद (घटनात्मक पद) नाही.
मंग उपमुख्यमंत्री नेमकं कोण असतात ?
• उपमुख्यमंत्री हे एक राजकीय पद आहे.
• राजकीय वाटाघाटी आणि स्थिर सरकारासाठी केलेली ही एक तरतूद आहे.
• उपमुख्यमंत्री हे मंत्री मंडळातील कॅबिनेटमंत्री असतात.
• उपमुख्यमंत्री शपथ देखील कॅबिनेटमंत्री म्हणूनच घेतात, त्यानंतर मुख्यमंत्रांच्या शिफारसीवर राज्यपाल त्याना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा देतात.
• खरं तर उपमुख्यमंत्री पदाची खरी ताकद त्यांच्याकडे असणाऱ्या खात्याकडे असते.
उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि पद काढून घेणे
• उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि उपमुख्यमंत्री पद काढून घेणे हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून असते.
• मुख्यमंत्री एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री नियुक्त करू शकतात.
• उदाहरणार्थ : सध्या महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री आहेत.
• आंध्र प्रदेशात श्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमध्ये एकूण 5 उपमुख्यमंत्री होते.
उपमुख्यमंत्री का बनविले जातात ?
राजकीय तडजोड :
• ज्यावेळेस निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळेस दोन किंवा अनेक पक्ष किंवा अपक्ष उमेदवार एकत्र येऊन सरकार स्थापन केले जाते.
• त्यावेळेस सरकारला स्थिरता प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री बनवले जातात.
सर्व समावेशक भावना आणि जातीय समीकरण :
• सरकार स्थापन झाल्यानंतर एका जातीचा मुख्यमंत्री बनविला तर दुसरी जात नाराज होऊन नये म्हणून दुसऱ्या प्रबळजातीला उपमुख्यमंत्री देऊन जातीय समीकरण साधले जाते.
• उपमुख्यमंत्री हे सर्वसमावेशकतेला चालना देणारे विविध प्रदेश, समुदाय किंवा राज्यातील स्वारस्य गटांचे प्रतिनिधित्व करतात.
पक्षांतर्गत कारण :
एकाच पक्षातील प्रमुख नेत्यांमधील नाराजी किंवा मतभेद टाळण्यासाठी तसेच सरकारमध्ये आपल्या आवडत्या नेत्याची सोय करण्यासाठी उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान बनवले जातात.
भारतात पहिले उपमुख्यमंत्री कोण होते ?
बिहाराचे श्री नारायण सिंह हे स्वतंत्र भारताचे पहिले उपमुख्यमंत्री बनले होते.
भारतात किती राज्यांत उपमुख्यमंत्री आहेत ?
भारतात सध्या 15 राज्य आणि 1 केंद्र केंद्रशासित प्रदेशात उपमुख्यमंत्री आहेत.
- जम्मू आणि काश्मीर (केंद्र केंद्रशासित प्रदेश)
- कर्नाटक
- आंध्रप्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- बिहार
- छत्तीसगड
- हिमाचल प्रदेश
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- मेघालय
- नागालॅंड
- ओडीशा
- राजस्थान
- तामिळनाडू
- तेलंगणा
- उत्तरप्रदेश
2 उपमुख्यमंत्री असणारे राज्ये कोणती ?
• भारतात सध्या 9 राज्यांमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत.
• बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांत प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत.
श्री अजितदादा पवार यांनी किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ?
श्री अजितदादा पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.