
चालू घडामोडी 05, ऑगस्ट 2024

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
Mahila Samman Savings Certificate (MSSC) Scheme
Subject : GS- सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल खालील पैकी योग्य पर्याय निवडा.
1. ही योजना आझादी का अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ वित्त मंत्रालयाने 2023 मध्ये सुरू केली आहे.
2. ही योजना महिला किंवा मुलींच्या नावे कमाल 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देते.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
_Scheme_1722936974994.webp)
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने बद्दल महत्त्वाची माहिती :
• महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) ही महिला गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ वित्त मंत्रालयाने 2023 मध्ये सुरू केलेली एक छोटी बचत योजना आहे.
• ही योजना सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी समर्पित जोखीममुक्त योजना आहे.
• ही योजना दोन वर्षांच्या कालावधीसाठी, म्हणजे मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध राहील.
• या योजनेअंतर्गत महिला किंवा मुलींच्या नावे 2 वर्षांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत बॅंकेत पैसे ठेवता (Deposit) येतील.
गुंतवणूक (Investment) :
• महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने अंतर्गत कमीत कमी 1000 रूपये तर जास्तीत जास्त व 2 लाख रुपयांपर्यंत बॅंकेत पैसे ठेवता (Deposit) येतील.
• या ठेवलेल्या रकमेवर 7.5 टक्के असे निश्चित व्याज दर मिळते.
• योजनेच्या (मॅच्युरिटी) कालावधी खाते उघडल्याच्या तारखेपासून 2 वर्षे आहे.
INS शाल्की
INS Shalki
बातम्यांमध्ये : भारतीय नौदल पाणबुडी (INS) शाल्की अलीकडेच दोन दिवसांच्या औपचारिक भेटीसाठी कोलंबो बंदरात दाखल झाली.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेली भारतीय नौदल पाणबुडी (INS) शाल्की खालील पैकी कोणत्या कंपनीने बनवलेली आहे ?
1. माझगाव डॉकयार्ड लिमिटेड
2. गोवा शिपयार्ड लिमिटेड
3. कोचीन शिपयार्ड
4. यांपैकी नाही
उत्तर : माझगाव डॉकयार्ड लिमिटेड

INS शाल्की बद्दल थोडक्यात माहिती :
• INS शाल्की ही शिशुमार श्रेणीची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे.
• हि पाणबुडी माझगाव डॉकयार्ड लिमिटेड या कंपनीने बनवलेली आहे.
• भारतात बांधलेली INS शाल्की ही पहिली पाणबुडी आहे.
• 7 फेब्रुवारी 1992 रोजी INS शाल्की भारतीय नौदलात दाखल झाली.
• INS शाल्की 40 लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
• पाण्याच्या पृष्ठभागावर तिचा ताशी 20 किलोमीटर (11 नॅाट्स) तर पाण्याखाली ताशी 20 किलोमीटर (22 नॅाट्स) वेग आहे.
नोट : पाण्यातून प्रवास केलेले अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैल हे एकक वापरले जाते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या शिशुमार श्रेणी, सिंधूघोष श्रेणी, तलवारी श्रेणी हे कशाचे प्रकार आहे ?
1. लढावू जहाज
2. पाणबुडी
3. मशीन गण
4. लढावू विमान
उत्तर. : पाणबुडी
98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ------ येथे होणार आहे.
1. पुणे
2. नाशिक
3. दिल्ली
4. नागपूर
उत्तर : दिल्ली

आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आणि केव्हा पार पडले ?
• ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या सहकार्याने 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
• पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते.
97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :
• 4 फेब्रुवारी 2024 जळगावच्या अमळनेरमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक रवींद्र शोभणे हे होते.
नोव्हाक जोकोविच ऑलम्पिक मध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले
Novak Djokovic wins Gold Medal in Olympics
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकलेला नोव्हाक जोकोविच खालील पैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
1. अमेरिका
2. इंग्लंड
3. सर्बिया
4. अर्जेंटिना
उत्तर : सर्बिया

• नोव्हाक जोकोविच याने 4 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझचा पराभव करून ऑलम्पिक सुवर्णपदक जिंकले
• ऑलम्पिक पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू होण्याचा बहुमानही त्याच्या नावावर नोंदविला गेला आहे.
• त्याने ही कामगिरी वयाच्या 37 व्या वर्षी केली.
• नोव्हाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे
• त्याने टेनिसमधील सर्व ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत. (ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन)
• नोव्हाक जोकोविच याने 2008 च्या बिजिंग ऑलम्पिक पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 च्या विम्बल्डन टेनिस (पुरुष एकेरी) चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे ?
(अमरावती SRPF 2024 मध्ये झालेली परीक्षा)
1. नोव्हाक जोकोविच
2. रॉजर फेडरर
3. राफेल नदाल
4. कार्लोस अल्काराझ
उत्तर : कार्लोस अल्काराझ