
चालू घडामोडी 11, डिसेंबर 2024 | महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण ?
![[ Maharashtra Vidhansabha adhyaksha kon, maharashtra vidhansabha nivadnuk, Maharashtra Legislative Assembly Speaker, vidhansabha adhyaksha nivadnuk, vidhansabha adhyaksha adhikar, vidhansabha adhyaksha karyakal, vidhansabha adhyaksha mahiti, vidhansabha adhyaksha power, 10 schedule of constitution of India, 10 vi anusuchi, pakshantar Bandi kayda, vidhansabha sadasya apatrata, maharashtra vidhansabha sadasya apatrata case, thakre gat, shinde gat, Rahul Narwekar, 2024 maharashtra assembly election, 2024 maharashtra vidhansabha nivadnuk, mantrimandal, cabinet mantri, cabinet mantri kon, gruhmantri, Arthkhat, khatevatap, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maharashtra-Vidhansabheche-Adhyaksha-Kon_1734096965041.webp)
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण ?
Who is the speaker of Maharashtra Vidhan Sabha ?
Subject : GS - राज्यशास्त्र, भारताची राज्यघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे ?
(MPSC, STI 2011)
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. उपमुख्यमंत्री
4. स्पिकर
उत्तर : स्पिकर
विधानसभा अध्यक्षांना स्पिकर ॲाफ असेंबली असे म्हणतात.
बातमी काय आहे ?
• नुकतीच श्री राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
• श्री राहुल नार्वेकर हे भाजप नेते आणि विधानसभा आमदार आहे.
• 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून ते निवडून आले आहे.
• श्री राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष झाले.
![[ Rahul Narvekar, BJP Nete, South Mumbai Aamdar, Kulaba Matdaarsangha, Dusryanda Maharashtra Vidhansabha Adhyaksha ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maharashtra-Vidhansabha-Adhyaksh-Rahul-Narvekar_1734087624111.webp)
विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी केली जाते ?
• विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीची तारीख राज्यपालां मार्फत निश्चित केली जाते.
• त्यानंतर नव्याने निवडून आलेली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवडणूक केली जाते.
• विधानसभा आपल्या सदस्यांमधून एकाची साध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून निवडणूक करते.
विधानसभा अध्यक्ष किती वर्ष या पदावर राहू शकता ?
विधानसभा अध्यक्ष पदावधी किती ?
विधानसभेच्या अध्यक्षांचा पदावधी विधानसभेच्या कालावधी इतकाच असतो.
विधानसभा अध्यक्षांचे पद केव्हा रिक्त होते ?
राज्यघटनेतील कलम 189 मध्ये विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त होण्यासंदर्भात माहिती दिली आहे.
• जर त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर,
• जर त्यांनी आपल्या पदाचा लेखी राजीनामा उपाध्यक्षांना दिला तर
• जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेने पारित (पास) केला तर
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहे ?
• विधानसभांचे बैठकांचे अध्यक्ष स्थान विधानसभेचे अध्यक्ष भुषवितात. विधानसभेच्या कामकाजाचे नेमणूक करून तिथे सुव्यवस्था व सभ्यता राखणे.
• गणसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा निलंबित करण्याचा अधिकार
• एखादे विधेयक धनविधेयक (Money Bill) आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार
• 10 व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणावरून विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार
• विधानसभेच्या सर्व समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेचे अध्यक्ष करतात.
• विधानसभेचे अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाही मात्र समान मत पडल्यास अशा स्थितीत आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार हे काही महत्त्वाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहे.
विधानसभेचे अध्यक्ष कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात ?
• व्यवसाय सल्लागार समिती ( Business Advisory Committee)
• सामान्य उद्देश समिती (General Purpose Committee)
• नियम समिती (Rules Committee)