
चालू घडामोडी 18, डिसेंबर 2024 | एक देश, एक निवडणूक | One Nation, One Election म्हणजे काय ?
![[ What is One Nation, One Election, Loksabha election, vidhansabha election, ek desh, ek nivadnuk mhanje Kay, ek desh, ek nivadnukeche fayde, ek desh, ek nivadnukeche tote, rajyashastra, bhartiya rajyaghatna, One Nation, One Election bill, Benefits of One Nation One Election, Challenges Associated with One Nation One Election, upsc marathi, Matadar, political party, National political party, state political party, nivadnuk kharch kami hoiel, matdarancha sahbhaag anni matdaan takka vadel, vikas kamanvar nirbhand kami hotil, karmachari anni suraksha dalanche prathamik kaam, ek desh ek nivadnuk tote konte, bhartat yapurvi ekachveli nivadnuka jhalya ahet ka, loksabdha anni vidhansabhechya nivadnuka vegveglya kevha jhalya, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/One-Nation-One-Election-Ek-Desh-Ek-Nivadhnuk_1734669659258.webp)
एक देश, एक निवडणूक म्हणजे काय ?
One Nation, One Election
बातमी काय आहे ?
नुकतच एक देश, एक निवडणूक संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं.
Subject : GS - राज्यशास्त्र, निवडणूक
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) एक देश, एक निवडणूक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
1. श्री नरेंद्र मोदी
2. श्री अमित शहा
3. श्री रामनाथ कोविंद
4. श्री पवन कल्याण
उत्तर : श्री रामनाथ कोविंद
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एक देश, एक निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत.
एक देश, एक निवडणूक म्हणजे काय ?
What is ‘One Nation, One Election’ ?
देशातील लोकसभा, देशभरातील राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे म्हणजे एक देश, एक निवडणूक.
एक देश, एक निवडणूकीचा फायदा काय ?
निवडणूक खर्च कमी होईल :
• प्रशासकीय, शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
• एकाचवेळी निवडणुकांमुळे सरकार आणि राजकीय पक्षांवरील प्रचंड आर्थिक भार कमी होऊ शकतो.
• माहितीनुसार 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अंदाजे 60,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे.
• असा अंदाज आहे की एक देश, एक निवडणुकीमुळे 7,500 कोटी ते 12,000 कोटी रुपयांची बचत होऊ शकते.
• त्याऐवजी हा पैसा पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो.
मतदारांचा सहभाग आणि मतदान टक्का वाढेल :
• काही महिन्यांच्या अंतरावर येणाऱ्या निवडणुकांना अनेक जण मतदान करण्यास येण्यासाठी टाळाटाळ करतात.
• लॅा कमिशनच्या रिपोर्टनुसार, एक देश एक निवडणूक मुळे मतदान टक्का वाढेल. कारण लोकांना एकाच वेळी मतदान करणे सोयीची जाईल.
विकास कामांवर निर्बंध कमी होतील :
• आचारसंहितामुळे निवडणुकीदरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास बंदी असते त्यामुळे विकास कामांवर निर्बंध येतात.
• राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ निवडणूक प्रचारात जात असतो.
• एक देश, एक निवडणुकीमुळे विकासावर लक्ष केंद्रित करत असल्याने धोरणनिर्मिती अधिक कार्यक्षम बनेल.
कर्मचारी आणि सुरक्षा दलांचे प्राथमिक काम :
• प्रशासकीय, शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
• एक देश, एक निवडणुकीमुळे हे शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल आपल्या प्राथमिक कामावर अधिक लक्ष देऊ शकतील.
• निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील न्यायालयांवरील ताण कमी होईल.
एक देश, एक निवडणूकीचे तोटे कोणते ?
• देशात सोबत निवडणूक घेतल्यास निवडणुकीदरम्यान स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडता येणार नाही.
• स्थानिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षांसोबत खर्च आणि रणनीती यामध्ये स्पर्धा करू शकणार नाहीत.
• जर अति केंद्रीकरण झाले तर देशातील संघराज्यीय व्यवस्था धोक्यात येऊ शकते.
• एखाद्या राज्यात किंवा केंद्रात एखादे सरकार वेळेपूर्वी विसर्जित झाले तर संपूर्ण एक देश, एक निवडणूक घेण्याची योजना विस्कळीत होईल.
• सरकारिया आयोगाने (1988) अति केंद्रीकरणाविरुद्ध इशाराही दिला होता. यामुळे राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या सहकारी संघराज्याची भावना नष्ट होऊ शकते.
भारतात यापूर्वी एकाचवेळी निवडणुका झाल्या आहेत का ?
• राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर, 1951 ते 1967 या काळात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या.
• लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 मध्ये एकत्र झाल्या.
• त्यानंतर 1957, 1962 आणि 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकाही एकत्र झाल्या.
मंग लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या केव्हा झाल्या ?
• लोकसभा आणि विधानसभेची मुदत 5 वर्षांची असते.
• परंतु काही राज्यांच्या विधानसभा 1968 आणि 1969 मध्ये मुदतीपूर्वच विसर्जित करण्यात आल्या.
• त्यानंतर 1970 मध्ये लोकसभा मुदतीपूर्वच विसर्जित करण्यात आली.
• त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या.