
चालू घडामोडी 17, डिसेंबर 2024 | टाइम्सचा 2024 चा पर्सन ऑफ दी इयर कोण ?
![[ Time Person of the Year, who is Person of the Year, Donald Trump, Mahatma Gandhi, Indian who get Time Person of the Year, puraskar, American president, Time magazine, puraskar, pm Modi na kontya deshache puraskar bhetle, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Time-2024-Award-Winner_1734526241930.webp)
टाइम्सचा 2024 चा पर्सन ऑफ दी इयर कोण ?
Time Person of the Year
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच 2024 सालासाठी " टाइम पर्सन ऑफ दी इयर" म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
1. बराक ओबामा
2. नरेंद्र मोदी
3. डोनाल्ड ट्रम्प
4. कमला हॅरिस
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)
बातमी काय आहे ?
• नुकताच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा पर्सन ऑफ दी इयर म्हणून निवड केली गेली.
• टाइमच्या "पर्सन ऑफ द इयर" म्हणून दोनदा निवड झालेल्या जगातील मोजक्या लोकांपैकी डोनाल्ड ट्रम्प हे आहे.
• याआधी 2016 मध्ये पहिल्यांदा त्यांची ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांची पर्सन ऑफ दी इयर साठी निवड का करण्यात आली ?
• टाइम मॅगझिनचे संपादक-इन-चीफ सॅम जेकब्स यांनी ट्रम्प यांची निवड करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाला पुन्हा एकदा नव्या प्रकारे परिभाषित केल्याबद्दल आणि अमेरिकेच्या जागतिक भूमिकेत बदल घडवून आणल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची ‘पर्सन ऑफ द इयर’ साठी निवड करण्यात आली आहे.”
टाइम चे "पर्सन ऑफ द इयर" म्हणजे नेमकं काय ?
• टाइम मासिक हे जगातील सर्वात लोकप्रिय मासिकांपैकी एक आहे आणि दरवर्षी पर्सन ऑफ दी इयर निवडते.
• व्यक्ती, समूह, कल्पना किंवा वस्तू "ज्यांनी त्या वर्षीच्या चांगल्या किंवा वाईट घटनांवर सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे", त्यांना पर्सन ऑफ दी इयर निवडले जाते.
• 1927 पासून ते दरवर्षी प्रकाशित होत आहे.
• 1927 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून ओळखले जाणारे पहिले व्यक्ती वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग होते.
टाइम्स पर्सन ऑफ दी इयर मिळालेले एकमेव भारतीय कोण ?
• आतापर्यंत केवळ एकाच भारतीय व्यक्तीचा या यादीमध्ये समावेश आहे.
• 1930 मध्ये महात्मा गांधी यांना पर्सन ऑफ द इअर म्हणून घोषित केले होते.
• 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली होती.