
चालू घडामोडी 13, डिसेंबर 2024 | भारतीय भाषा उत्सव
![[ Bharatiya Bhasha Utsav, Mahakavi Subramnaia Bharati, Bharatiya Bhasha Utsav theme, Bharatiya Bhasha Utsav ka sajri kartat, Bharatiya Bhasha Utsav kevha sajri kartat, Tamil literature, Tamil sahitya, Lokmanya Tilak, Bal Gangadhar Tilak, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhartiya-Bhasha-Utsav-2024_1734521519316.webp)
भारतीय भाषा उत्सव
Bharatiya Bhasha Utsav
Subject : GS - कला आणि संस्कृती -साहित्य, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय भाषा उत्सव खालील पैकी कोणत्या महान कवींच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
1. तुलसीदास
2. कालिदास
3. सुब्रमण्य भारती
4. सूरदास
उत्तर : महाकवी सुब्रमण्य भारती
बातमी काय आहे ?
• 4 ते 11 डिसेंबर 2024 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे भारतीय भाषा उत्सव साजरी करण्यात आला.
• हा उत्सव शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे साजरी केला जातो.
भारतीय भाषा उत्सव कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• भारतीय भाषा उत्सव महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या सन्मानार्थ साजरी करतात.
• हा उत्सव 11 डिसेंबर 2024 रोजी आदरणीय महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या जयंती साजरी करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेला आठवडाभर चालणारा उत्सव आहे.
भारतीय भाषा उत्सव का साजरी करतात ?
भारतीय भाषा उत्सव साजरी करण्याचा उद्देश काय आहे ?
• आपली सांस्कृतिक ओळख जपणे
• नागरिकांमध्ये एकता वाढवणे
• विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे.
• बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे
• शिक्षण आणि संशोधनासाठी भारतीय भाषा माध्यम तयार करणे
• भाषाप्रेमींच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे
• आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत अंतर्भूत असलेल्या भाषिक विविधतेचा प्रचार आणि प्रसार करणे हे भारतीय भाषा उत्सव साजरी करण्याचा उद्देश आहे.
भारतीय भाषा उत्सव 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"भाषांच्या माध्यमातून एकता" ("Unity through Languages") ही 2024 ची भारतीय भाषा उत्सवाची संकल्पना आहे.
आदरणीय महाकवी सुब्रमण्य भारती यांबद्दल थोडक्यात माहिती :
• सुब्रमणिया भारती हे भारतातील तमिळ लेखक, कवी, पत्रकार, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, समाजसुधारक आणि बहुभाषिक होते.
• त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1882 रोजी तामिळनाडूमधील एट्ट्यापुरम् येथे झाला.
• सुब्रमण्य भारती यांना महाकवी भारतियार म्हणूनही ओळखले जाते.
• महाकवी सुब्रह्मण्य भारती यांना आधुनिक तमिळ शैलीचे जनक मानले जातात.
![[ Mahakavi Subramanya Bharti, 11 December 1882, Mahakavi Bhartiyaar, Adhunik Tamil Shailiche Janak, Lokmanya Tilak Apar Nishta, Tilak Namacha jay aso, triwaar jayjaykar aso ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhartiya-Bhasha-Utsav-Mahakavi-Subhramanya-Bharti_1734517013593.webp)
देशभक्त महाकवी सुब्रमण्य भारती :
• महाकवी सुब्रह्मण्य भारती यांनी आपल्या लेखनातून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.
• त्यांनी आपल्या लिखाणातून भारतीय संस्कृतीचे मर्म आणि देशाचा आध्यात्मिक वारसा सर्वसामान्यांना समजण्यास सोपा असेल अशा भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवला.
• महाकवी भारती यांची लोकमान्य टिळकांवर अपार निष्ठा होती.
• वाळ्ग तिलकन नामम वाळ्ग वाळ्गवे (टिळक नामाचा जय असो, त्रिवार जयजयकार असो) हे त्यांनी लिहिलेले गाणे अत्यंत प्रसिद्ध झाले.