
चालू घडामोडी 11, डिसेंबर 2024 | RBI नवीन गव्हर्नर कोण ?
![[ RBI Governor, new RBI Governor, Reserve Bank of India, who appoint RBI Governor, RBI Governor Appointment Process, RBI che Governor kon ahe, RBI che Governor kon niyukt kartat, RBI che Governor pagar, RBI Governor salery, RBI chi sthapna, Bhartiya reserve Bank chi sthapna, Bhartiya reserve Bank che pahile Governor, C.D. Deshmukh, deputy Governor of RBI, Dr. M. D. Patra, Shri M. R. Rao, Shri T. Rabi Sankar, Shri Swaminathan, Sanjay Malhotra, rbi RBI meeting, RBI monetary policy, RBI financial policy, Arthashastra notes marathi madhe, banking exam notes marathi madhe, railway exam, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/RBI-Navin-Gpvernor-kon_1734097983082.webp)
RBI नवीन गव्हर्नर कोण ?
New RBI Governor
Subject : GS - नियुक्ती, अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन गव्हर्नर म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. श्री राहुल नार्वेकर
2. श्री संजय मल्होत्रा
3. श्री अनुराग गर्ग
4. श्री संजीव खन्ना
उत्तर : श्री संजय मल्होत्रा
1. श्री राहुल नार्वेकर : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
2. श्री संजय मल्होत्रा : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर
3. श्री अनुराग गर्ग : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक
4. श्री संजीव खन्ना : देशाचे 51 वे सरन्यायाधीश
बातमी काय आहे ?
• सरकारने महसूल सचिव श्री संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.
• रिझर्व्ह बँकेचे गवर्नर श्री शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपला.
• 11 डिसेंबर रोजी श्री संजय मल्होत्रा यांनी RBI चे नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला.
• RBI चे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे.
• श्री संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26 वे गव्हर्नर म्हणून काम पाहतील.
• श्री संजय मल्होत्रा हे 1990 च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
![[ RBI che navin governer, Sanjay Malhotra, Deputy Governor, Dr. M. D. Patra, Shri. M. R. Rao, Shri T. B. Sankar, Shri Swaminathan J ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/RBI-Navin-Governor-Sanjay-Malhotra_1734089030930.webp)
RBI गव्हर्नर यांची नियुक्ती कोण करतात ?
• RBI कायदा, 1934 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची नियुक्ती करण्यात येते.
• केंद्र सरकार RBI गव्हर्नरची नियुक्ती करते.
RBI गव्हर्नर नियुक्ती प्रक्रिया काय आहे ?
• यासाठी आर्थिक क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (Financial Sector Regulatory Appointment Search Committee) ही पात्र उमेदवारांची यादी तयार करते.
• ही समिती गव्हर्नर या पदासाठी मुलाखत (Interview) घेते.
• या समितीमध्ये कॅबिनेट सचिव, सध्याचे RBI गव्हर्नर, वित्तीय सेवा सचिव आणि दोन स्वतंत्र सदस्य असतात.
• समितीने निवडलेली नावे अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे (Appointment Committee of the Cabinet) पाठवली जातात.
• पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी ही मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती RBI गव्हर्नरची निवड करते.
RBI बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली.
• भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण (Nationalised) करण्यात आले.
• भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
• RBI भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) अंतर्गत काम करते.
• सर सी. डी. देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते.
RBI ची मुख्य उद्दिष्टे कोणती ?
• रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही देशाची मध्यवर्ती बँक आहे.
• बँकिंग प्रणाली नियंत्रित करण्यासाठी, भारतीय रुपया जारी करण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखणे ही RBI ची काही मुख्य उद्दिष्टे आहेत.
RBI गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर :
RBI चे 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात.
RBI चे वर्तमान गव्हर्नर :
श्री संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra)
RBI चे वर्तमान डेप्युटी गव्हर्नर :
1. डॉ. माइकल पात्रा (Dr. M. D. Patra)
2. श्री एम. राजेश्वर राव (Shri M. R. Rao)
3. श्री टी. रबी शंकर (Shri T. Rabi Sankar)
4. श्री स्वामीनाथन जानकीरमन (Shri Swaminathan J)