
चालू घडामोडी 11, डिसेंबर 2024 | विमा सखी योजना काय आहे ? | Bima Sakhi Yojana
![[ Bima Sakhi Yojana, LIC, vima sakhi yojna kay ahe, vima sakhi yojnecha form kuthe bharaycha, vima sakhi yojnecha form ssa bharaycha, vima sakhi yojna paise kiti milel, lic paise, yojneche paise kadhi milel, stipend kiti asel, yojnesathi patrata kay, vima sakhi yojna kevha suru keli, sarkari yojnaeche paise, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bima-Sakhi-Yojana-kay-ahe_1734097501279.webp)
विमा सखी योजना काय आहे ?
Bima Sakhi Yojana
Subject : GS - सरकारी योजना, अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) विमा सखी योजनेचे उद्घाटन खालील पैकी कोणत्या ठिकाणी केले ?
1. मुंबई
2. नवी दिल्ली
3. पानिपत
4. नागपूर
उत्तर : पानिपत (राजस्थान)
बातमी काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या पानिपतमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) विमा सखी योजनेचा शुभारंभ केला.
विमा सखी योजना काय आहे ?
• विमा सखी योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची योजना आहे.
• ही योजना फक्त महिलांसाठी असून या योजनेसाठी महिलाच अर्ज करु शकतात.
• या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार देऊन महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
विमा सखी योजना रोजगार कसा देईल ?
• या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा संदर्भात एकूण 3 वर्षांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
• प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला LIC एजंट म्हणून काम करु शकणार आहेत.
• ज्या महिलांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी देखील आहे.
• 3 वर्षांच्या कालावधीत 2 लाख विमा सखींची नियुक्ती करण्याची योजना आहे.
3 वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान पैसे मिळणार आहेत का ?
या योजनेच्या अंतर्ग महिलांना 3 वर्षांसाठी स्टायपेंड मिळणार आहे.
1. पहिल्या वर्षी प्रति महिना 7 हजार रुपये
2. दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6 हजार रुपये
3. तर तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये दिले जातील.
यामध्ये कमिशनचा समावेश नसेल. कमिशनच्या रुपात मिळणारे पैसे वेगळे असतील.
विमा सखी योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणत्या ?
• ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलेचे कमीत कमी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असायला हवे.
• तसेच महिलेचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असायला हवे.
• विमा सखी योजनेसाठी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांच्यापैकी कुणीही एलआयसी ( LIC ) कर्मचारी असता कामा नये.
• तसंच त्यांच्या नात्यातही कुणी LIC कर्मचारी असता कामा नये.