
चालू घडामोडी 13, डिसेंबर 2024 | विलो चिप म्हणजे काय ? | What is Willow Chip ?
![[ What is Willow Chip, who foundedWillow Chip, Willow Chip mhanje Kay, Willow Chip koni banavli, Google, Apple, supercomputer, artificial intelligence, krutrim budhimatta, computer binary system, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, shasranya ani shodh, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Willow-Chip_1734520556298.webp)
विलो चिप म्हणजे काय ?
What is Willow Chip ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - Computer
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अब्जावधी वर्षांचं काम 5 मिनिटांत करणारी क्वांटम कॉम्प्युटिंगसाठीची विलो (Willow) नावाची चिप खालील पैकी कोणत्या कंपनीने तयार केली आहे ?
1. गुगल (Google)
2. नासा (NASA)
3. ॲपल (Apple)
4. माइक्रोसॉफ़्ट (Microsoft)
उत्तर : गुगल (Google)
विलो चीप बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अलीकडे, Google ने विलो' नावाच्या चिपचे अनावरण केले आहे.
• विलो चीप ही अतिशय शक्तिशाली आणि वेगवान क्वांटम कंप्युटिंग चीप आहे.
• विलो चिप क्वांटम कंप्युटिंगमध्ये लक्षणीय प्रगती घोषित केली आहे.
• अस्तित्वात असणाऱ्या जगातल्या सगळ्यात फास्ट सुपरकॉम्प्युटरला जे गणित सोडवायला 10 सेप्टिलियन (10 Septillion - 10,000,000,000,000,000,000,000,000) एवढी वर्षं लागतील तेच गणित ही चिप 5 मिनिटांत सोडवेल असा दावा गुगलने केला आहे.
क्वांटम चीप म्हणजे काय ?
नेहमीची चीप आणि विलो चीप मध्ये फरक काय ?
• आपण कॉम्प्युटरमध्ये जे काही टाईप करतो जसे की शब्द, आकडे यांसारख्या सगळ्याचं कॉम्प्युटरच्या या बिट्सच्या भाषेत रूपांतर केलं जातं. आणि स्टोअर केलं जातं. यालाच म्हणतात कॉम्प्युटरची बायनरी सिस्टीम.
• या बिट्सची भाषा असते 0 आणि 1 ची.
• रेगुलर चीप मध्ये BITS झिरो किंवा वन असतात. म्हणजे एक तर झिरो असेल नाही तर वन असेल.
• परंतु क्युबिट हा 0 किंवा 1 किंवा एकाच वेळी 0 आणि 1 दोन्ही असू शकतो.
• क्वांटम कॉम्प्युटरमधले हे क्युबिट्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात. त्यामुळे कमी क्युबिट्समध्ये भरपूर माहिती साठवली जाऊ शकते. आणि ती माहिती अधिक वेगाने प्रोसेस केली जाऊ शकते.
क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे काय ?
• क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे भौतिकशास्त्रातल्या मूलभत कणांच्या तत्त्वांचा वापर करून एक शक्तिशाली कॉम्प्युटर.
• Trapped ions, Photons, कृत्रिम वा खरे अणु (Atoms) किंवा अर्धकणांपासून (Quasiparticles) क्युबिट बनलेले असू शकतात.
• क्वांटम कॉम्प्युटरमध्ये याच सूक्ष्म कणाच्या वर्तनाचा आणि गुणधर्मांचा वापर करून आपल्या नेहमीच्या कॉम्प्युटर्सपेक्षा वेगाने प्रॉब्लेम्स सोडवले जातात.
क्वांटम कॉम्प्युटिंगचा फायदा काय ?
• भौतिकशास्त्रातली जी गुंतागुंतीची समीकरणं सोडवण्यासाठी
• नवीन Drug Molecules म्हणजे औषधं शोधण्यासाठी
• जीवशास्त्र, खगोलशास्त्र ह्यांबद्दल आपली असलेली समज सीमित आहे. ती वाढवायला मदत करू शकतो.
• वैद्यकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सह विविध क्षेत्रात मोठे बदल घडवून येवू शकतात
क्वांटम कॉम्प्युटिंगचा धोका काय ?
• आपली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, चॅट मेसेजेस आणि इतर सेन्सिटिव्ह डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एनक्रिप्शन केलं जातं.
• सुपरकॉम्प्युटरला किंवा साध्या कॉम्प्युटरला हे एनक्रिप्शन भेदता येत नाही.
• पण हे एनक्रिप्शन भेदण्यासाठी या क्वांटम कम्प्युटरचा वापर केला जाऊ शकतो.
• क्वांटम कॉम्प्युटर्सचा वापर यांसारख्या चुकीच्या गोष्टींसाठी होण्याचा धोका देखील शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आला आहे.