
चालू घडामोडी 12, डिसेंबर 2024 | राष्ट्रीय पंचायत पुरस्कार | National Panchayat Awards 2024
![[ National Panchayat Awards 2024, Rashtriya panchayat puraskar 2024, Maharashtrala Rashtriya panchayat puraskar kiti milale, kontya grampanchayatila Rashtriya panchayat puraskar milala, manyachivadi gav, manyachivadi gaon, sarvotkrushtha gaon kont, satara jilha, Nanaji Deshmukh Sarvottam Panchayat Satat Vikas Puraskar, Gram Urja Swaraj Vishesh Panchayat Puraskar, Bela gaon, bhandara jilha, Carbon Neutral Vishesh Panchayat Puraskar, Modale grampanchayat, nashik jilha, Deen Dayal Upadhyay Panchayat Satat Vikas Puraskar, Tirora panchayat samiti, gondiya jilha, Nanaji Deshmukh Sarvottam Panchayat Satat Vikas Puraskar, Yashda sanstha pune, Panchayat Kshamta Nirmaan Sarvottam Sansthan Puraskar, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/National-Panchayat-Award-2024-Rashtriya-Panchayat-Puraskar-2024_1734099154933.webp)
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024
National Panchayat Awards 2024
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले ?
1. 10
2. 8
3. 7
4. 6
उत्तर : 6
बातमी काय आहे ?
• ग्रामीण भारतातील शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासात योगदान दिल्याबद्दल 45 उल्लेखनीय पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले .
• 11 डिसेंबर 2024 रोजी विज्ञान भवन , नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार का दिले जातात ?
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार गरिबी निवारण, आरोग्य, बालकल्याण, पाण्याची पुरेशी उपलब्धता, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि हवामान शाश्वतता यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार कोण कोणत्या श्रेणींमध्ये दिले जातात ?
यावर्षी विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे, जे तळागाळातील प्रशासन आणि समुदाय विकासातील यशस्विता विस्तृतपणे प्रतिबिंबित करतात.
या श्रेणींमध्ये
• दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार,
• नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार,
• ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार,
• कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार
• आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम पुरस्कार यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये सर्वात जास्त पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले ?
1. ओडिसा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी 7 पुरस्कार मिळवत पहिला क्रमांक पटकावला.
2. महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये एकूण 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळत दुसरा क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रात कोणास मिळाला ?
मान्याचीवाडी ग्रामपंचायत :
सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीला 2 श्रेणींमध्ये प्रथम पुरस्कार मिळाले.
1. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार
2. ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार प्रथम पुरस्कार
• मान्याचीवाडी ग्रामपंचायत दोन पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली.
• मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला 2.5 कोटी रुपये पुरस्कार मिळाला.
बेळा ग्रामपंचायत :
• कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील बेळा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार मिळाला.
मोडाळे ग्रामपंचायत :
नाशिक जिल्ह्यातल्या मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीत स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत हा 3 ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
मिळाला.
तिरोरा पंचायत समिती :
• नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्तम ब्लॉक पंचायत श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा या पंचायत समितीला तृतीय पुरस्कार मिळाला
यशदा संस्थेला पुरस्कार :
• राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• महाराष्ट्रातील पुणे येथील यशदा संस्थेला पंचायती राज संस्थांच्या क्षमता बळकट करण्यासाठी आणि शाश्वत विकासाच्या स्थानिकीकरणासाठी क्षमता बळकट करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.