
चालू घडामोडी 12, डिसेंबर 2024 | भारता बद्दल जागतिक मलेरिया अहवाल 2024 काय सांगतो ? | World Malaria Report 2024
![[ World Malaria Report 2024, jagtik Malaria ahawal, World Health Organization, jagtika arogya sanghatna, WHO Report, malaria death, malaria patients, Malaria kasa hoto, Plasmodium parasites, female Anopheles mosquitoes, tropical countries disease, World Health Organization, World Health organisation, WHO, jagtik arogya sanghatna, Malariachi lakshane, upay, upchar, Malaria mukt Desh konta, vinyan ani tantradnyan notes, science questions, science notes, Rog ani ajar, ushankatibhandhiya Desh, Jagtik Malaria divas kevha asto, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Jagtik-Malaria-Ahwal-2024_1734148373228.webp)
भारता बद्दल जागतिक मलेरिया अहवाल 2024 काय सांगतो ?
World Malaria Report 2024
Subject : GS - जागतिक संघटना, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक मलेरिया अहवाल प्रसिद्ध केला त्यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) अहवालानुसार भारतामध्ये मलेरिया घटनांमध्ये घट दिसून आली.
ब) 2024 मध्ये भारत अधिकृतपणे हाय बर्डन टू हाय इम्पॅक्ट (HBHI) गटातून बाहेर पडला.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
जागतिक मलेरिया अहवाल 2024 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जागतिक मलेरिया अहवाल कोण प्रसिद्ध करतात ?
• जागतिक मलेरिया अहवाल जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येतो.
• हा अहवाल जगभरातील देशांमधील मलेरिया आजाराचा प्रादुर्भाव किती आहे ? देशांत मलेरियामुळे किती लोकांचा मृत्यू झाला ? यांसारख्या आवश्यक डेटा देतो.
• या डेटा देशांना मलेरियाविरुद्धची लढाईतील अंतरांचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.
• जगभरात मलेरिया चे रूग्ण वाढत आहे.
• या अहवालानुसार 2023 मध्ये अंदाजे 263 दशलक्ष मलेरियाचे रूग्ण आढळून आले. त्यांपैकी 5,97,000 लोकांचा मृत्यू झाला.
भारता बद्दल जागतिक मलेरिया अहवाल 2024 काय सांगतो ?
भारतामध्ये मलेरिया घटनांमध्ये घट दिसून आली :
• भारतामध्ये 2017 मध्ये 64 लाख मलेरिया रूग्ण होते, ते कमी होऊन 2023 मध्ये 20 लाख मलेरिया रूग्णांची नोंद करण्यात आली.
• भारतामध्ये मलेरिया रूग्णांची 69% ने घट झाली.
मलेरियामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले :
• तसेच भारतात मलेरियामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 2017 मध्ये 11,100 होते ते कमी होऊन 2023 मध्ये 3,500 पर्यंत आले.
• मलेरियामुळे होणारा मृत्यूदरात 68% ने घट झाली.
भारतात, मलेरियाच्या घटना आणि मृत्युदरात लक्षणीय घट झाल्यामुळे 2024 मध्ये भारत अधिकृतपणे हाय बर्डन टू हाय इम्पॅक्ट (HBHI) गटातून बाहेर पडला असल्याचे WHO च्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मलेरिया आजार कसा होतो ? मलेरियाची प्रसार कसा होतो ?
• मलेरिया हा प्लाज्मोडियम परजीवीमुळे (Plasmodium Parasites) होणारा तीव्र तापाचा आजार आहे.
• हा आजार संक्रमित मादी ॲनोफिलीस डासांच्या (Female Anopheles Mosquitoes) चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो.
• हा एक जीवघेणा रोग आहे जो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो.
मलेरिया संसर्गजन्य आजार आहे का ?
• मलेरिया हा संसर्गजन्य आजार नाही.
• मलेरिया एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही.
• हा आजार मादी ॲनोफिलीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो.
मलेरिया आजाराची लक्षणे काय असतात ?
• मानवी शरीरात प्लाज्मोडियम परजीवी लाल रक्त पेशींना संक्रमित करतात, ज्यामुळे ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात.
• गंभीर प्रकरणांमध्ये, मलेरियामुळे अवयव निकामी होणे, कोमा आणि व्यक्तींचा मृत्यू देखील होऊ शकतो.
उपचार : मलेरियाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने मलेरिया आजार बरा होतो.
जागतिक मलेरिया दिवस केव्हा असतो ?
• दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो.
• जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) 2007 मध्ये मलेरियाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी याची स्थापना केली होती.