
चालू घडामोडी 13, डिसेंबर 2024 | चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
![[ Madhav Gadgil, ‘Champions of the Earth award’ for 2024, Lifetime Achievement Award, gadgil committee, gadgil samiti, gadgil ayog, United Nations, UNEP, Environment award, paryavaran puraskar, puraskar, spardha parishesathichi puraskar list, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Champions-of-the-Earth-Award-2024_1734521037576.webp)
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
Champions of the Earth Award 2024
Subject : GS - पर्यावरण, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संयुक्त राष्ट्राचा " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " हा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला ?
1. सुंदर लाल बहुगुणा
2. मेधा पाटकर
3. राजेंद्र सिंह
4. माधव गाडगीळ
उत्तर : माधव गाडगीळ
बातमी काय आहे ?
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ श्री माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार काय आहे ?
• " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " हा संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
• " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार पहिल्यांदा 2005 मध्ये देण्यात आला.
"चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार कोणाला देण्यात येतो ?
जगभरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या, निसर्ग आणि जैवविविधतेचे नुकसान, प्रदूषण आणि कचरा तसेच हवामान बदलाच्या संकटाला शाश्वत मार्गाने तोंड देता येईल, यासंदर्भात उपाय सुचवणाऱ्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना, कार्यकर्त्यांना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
![[ Padmashri, Padmabhushan, Karnatak sarkarcha rajyotsav puraskar, champions of the earth award, vikram sarabhai puraskar, ishwarchandra vidhyasagar puraskar, jeevan puraskar, tyler puraskar, paryavaran shastrdnya, shikshan tadnya, lekhak, center for ecology science sansthapak, first biosphere reserve, nilgiri biosphere, pantapran vighyan va tantragyaan salagaar mandalache sadasya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Champions-of-the-Earth-Award-Madhav-Gadgil_1734516834333.webp)
श्री माधव गाडगीळ यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री माधव गाडगीळ हे भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक आणि सेंटर फॉर इकोलॉजी सायन्सचे संस्थापक आहेत.
• श्री माधव गाडगीळ हे जगातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञांपैकी एक आहेत.
• त्यांनी वनस्पती, पाणी, पशू-पक्षी, निसर्ग आणि मानवाचे संबंध, निसर्गात मानवाचा हस्तक्षेप याबाबत अभ्यास करून महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
• त्यांना भारतातील पहिले बायोस्फीअर रिझर्व्ह, निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्ह याच्या स्थापनेचे श्रेय दिले जाते.
• 1986 ते 1990 या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते.
सरकारने गाडगीळ आयोगाची स्थापन कशासाठी केली होती ?
• पश्चिम घाटाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशावर हवामान बदल, विकास आणि लोकसंख्येचा परिणाम यांचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता समितीचे ते अध्यक्ष होते.
• त्यांच्या नावावरून या आयोगास "गाडगीळ आयोग" म्हणून ही ओळखले जाते.
श्री माधव गाडगीळ यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी परीक्षेसाठी महत्त्वाचे पुरस्कार :
• भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार
• कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
• संयुक्त राष्ट्राचा " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार
• जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
• विक्रम साराभाई पुरस्कार
• ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
• पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन २०१५ चा टायलर पुरस्कार