महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार
Maharashtra Cabinet Expansion
Subject : GS - राज्यशास्त्र, राज्य मंत्रिमंडळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कलम 164 (1A) नुसार राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या किती टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
1) 10 टक्क्यांपेक्षा
2) 15 टक्क्यांपेक्षा
3) 20 टक्क्यांपेक्षा
4) 25 टक्क्यांपेक्षा
उत्तर : 15 टक्क्यांपेक्षा
बातमी काय आहे ?
• नागपूर मधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
• यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्य मंत्र्यांना पद आणि गोपनेतीची शपथ दिली.
• मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा याआधीच शपथविधी झाला होता.
• हे 3 व आजचे 39 असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान 42 झाले आहे.
• कायद्यानुसार 43 मंत्रिपदांची तरतूद असल्याने 1 मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.
• महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात 4 महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.
भाजपचे मंत्रिमंडळातील मंत्री
महाराष्ट्रात भाजपचे श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
तसंच, 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला आले आहेत.
![[ ministers from the BJP, Chandrashekar Bawankule, Radhakrishna Vikhe Patil,Chandrakant Patil,Girish Mahajan,Ganesh Naik, Mangal, Prabhat Lodha, Jaykumar Rawal, Pankaja Munde, Atul Save, Ashok Ramaji Wooike, Ashish Shelar, Shivendra Raje Bhosale, Jaykumar Gore, Sanjay Savkare, Nitesh Rane, Akash Pandurang Fundkar, Madhuri Misal, Meghana Bordikar, Pankaj Bhoyar ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/BJP-Minister-List_1734517777623.webp)
शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्रिमंडळातील मंत्री
शिवसेनेचे प्रमुख नेते श्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.
![[ ministers from the Shiv Sena, Uday Samant, Dada Bhuse, , Sambhuraj Desai, Sanjay Rathod, Gulabrao Patil, Bharat Gogawale, Pratap Sarnaik, Prakash Abitkar, Ashish Jaiswal, Sanjay Shirsat, Yogesh Kadam ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Shivsena-Minister-List_1734517804165.webp)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्रिमंडळातील मंत्री
उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 कॅबिनेट, तर 1 राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
![[ ministers from NCP, Hasan Mushrif, Dhananjay Munde, Aditi Tatkare, Narhari Zirwal, Dattatray Bharne, Makarand Patil, Babasaheb Patil, Indraneel Naik, Manikrao Kokate ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Rashtrawadi-Minister-List_1734517825654.webp)
कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे काय ?
कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांमधील फरक काय ?
केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राज्य मंत्रिमंडळामध्येही मुख्यमंत्री व मंत्री यांचा समावेश होतो.
मंत्रिमंडळामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात :
1. कॅबिनेट मंत्री
2. राज्यमंत्री
3. उपमंत्री
कॅबिनेट मंत्री (Cabinet Ministers) :
• कॅबिनेट मंत्री हे सहसा पक्षाचे ज्येष्ठ सदस्य असतात त्यांना राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे किंवा खात्यांचे मंत्री बनविण्यात येते. उदाहरणार्थ : गृह खाते, वित्त खाते, कृषी खाते इत्यादी.
• कॅबिनेट मंत्र्यांच्या गटाला कॅबिनेट असे म्हणतात.
• कॅबिनेटच्या सभांना ते हजर राहतात व त्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
राज्यमंत्री (Ministers of State) :
राज्यमंत्री दोन प्रकारचे असतात.
1. राज्य मंत्र्यांना मंत्रालयाचा किंवा विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिला जातो असे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री.
2. कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्यक म्हणून नेमलेले राज्यमंत्री.
उपमंत्री (Deputy Ministers)
• उपमंत्र्यांना विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही.
• ते कॅबिनेट मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना सहाय्यक म्हणून कार्य करतात तसेच या मंत्र्यांना उपमंत्री त्यांच्या प्रशासकीय, राजकीय तसेच विधान मंडळातील कामकाजात मदत करतात.
राज्यात किती मंत्री असू शकतात ?
• कलम 164 (1A) नुसार राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
• तसेच मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही.
• अशी तरतूद घटनेमध्ये 91 व्या घटना दुरुस्ती कायदा 2003 अन्वये करण्यात आली.
• महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे.
• कलम 164 (1A) नुसार 288 च्या 15 % म्हणजेच महाराष्ट्रात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात.