डॉ. राजेंद्र प्रसाद
Dr. Rajendra Prasad
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथी दिनी मानवंदना 🙏💐💐
Subject : GS - राज्यशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती - मुंबई पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस चालक 2023, चंद्रपूर पोलीस 2023, नांदेड पोलीस 2023, जालना पोलीस 2021, .....)
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. सरदार वल्लभभाई पटेल
4. पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म आणि शिक्षण :
• त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील जीरादेई या खेड्यात झाला.
• ते 1902 मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले.
• 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
• त्यांनी 1937 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केली.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान :
1911 मध्ये, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले.
चंपारण सत्याग्रह (1917) :
• बिहारच्या 1917 च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधींशीं त्यांचा परिचय वाढला.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चंपारण सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा दिला.
• असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांनी बिहारमध्ये असहकार पुकारला आणि राज्याचा दौरा केला, जाहीर सभा आयोजित केल्या आणि समर्थन मिळविण्यासाठी भाषणे दिली.
• रौलट कायदा रद्द व्हावा, म्हणून देशात 1919 मध्ये सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आले.
• 1921 मध्ये पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करून स्वदेशी, मद्यपानबंदी, खादीचा प्रसार इ. कार्यक्रम हाती घेतले.
• 1931 मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ऑक्टोबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले.
• 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली.
• 1947 मध्ये जे. बी. कृपलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद हे तिसऱ्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा संविधान निर्मितीत सहभाग :
• 1946 मध्ये, राजेंद्र प्रसाद भारताच्या हंगामी सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री म्हणून पदभार सांभाळला.
• 1946 ते 1950 या काळात संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
डॉ. राजेंद्र प्रसाद संविधान सभेच्या कोण कोणत्या समितींचे अध्यक्ष होते ?
सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, वित्त आणि कर्मचारी समिती या संविधान सभेच्या समितींचे डॉ. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते.
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत ?
• डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 पर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम केले.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 12 वर्षे भारताचे राष्ट्रपती होती.
• भारत सरकारने 1962 मध्ये भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला.
• निवृत्तीनंतर ते बिहारमधील आपल्या सदाकत आश्रमात राहण्यास गेले.
• डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 28 फेब्रुवारी 1963 रोजी निधन झाले.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेली काही पुस्तके :
• "चंपारण येथील सत्याग्रह" (Satyagraha at Champaran)
• " इंडिया डिवायडेड" (India Divided)
• " आत्मकथा” (Atmakatha)
• “महात्मा गांधी आणि बिहार, काही आठवणी” (Mahatma Gandhi and Bihar, Some Reminiscences), आणि
• “बापू के कदमों में” (Bapu ke Kadmon Mein)