स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar
भारत मातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास, क्रांतीकारक, समाजसुधारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ------- संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
(MPSC, STI 2016, अहमदनगर पोलीस भरती 2017)
1. बॉम्बे असोसिएशन
2. होमरूल
3. अभिनव भारत
4. लँड होल्डर्स असोसिएशन
उत्तर : अभिनव भारत
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?
(सरळसेवा भरती, नाशिक ग्रामीण पोलीस चालक भरती 2023)
• स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 ला नाशिक जवळच्या भगूर येथे झाला.
• सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.(L.L.B) पर्यंत झाले.
• पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी कोण कोणत्या संस्था स्थापन केल्या ?
• त्यांनी 1899 मध्ये लहान वयातच 'राष्ट्रभक्त समूह' ही गुप्त संघटना स्थापन केली.
• 1 जानेवारी 1900 रोजी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली.
• 1904 रोजी मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत संघटने मध्ये करण्यात आले.
• 1906 मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले.
• लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'फ्री इंडिया सोसायटी' स्थापन केली.
• फ्री इंडिया सोसायटी' च्या माध्यमातून लंडनमध्ये शिकायला येणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांमार्फत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगासमोर मांडणं, तिथल्या भारतीयांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त केले.
• स्वातंत्र्यवीर सावरकर हे 20व्या शतकातील भारताचे पहिले लष्करी धोरणात्मक व्यवहार तज्ञ होते, ज्यांनी देशाला एक मजबूत संरक्षण आणि राजनैतिक सिद्धांत दिला.

खटला आणि शिक्षा :
• 1909 मध्ये मोर्ले-मिंटो सुधारणांविरुद्ध सशस्त्र बंडाचा कट रचल्याच्या आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करण्यात आली.
• 1910 मध्ये इंडिया हाऊस या क्रांतिकारी गटाशी संबंध असल्याबद्दल त्यांना अटक झाली.
• अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले यासाठीचे पिस्तुले सावरकरांनी धाडली होती. असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लावला गेला.
• या खटल्यांनंतर, स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्याला काळ्या पाण्याची शिक्षा असेही म्हणतात.
• " पन्नास वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना " हे उद्गार यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काढले. (ठाणे पोलीस 2021)
• 1911 मध्ये त्यांना अंदमान आणि निकोबार बेटे येथील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे सामाजिक कार्य :
(MPSC, PSI 2014)
• अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजन, सहपूजन, हळदीकुंकू समारंभ साजरे केले.
• अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला, त्यांना इतर मुलांच्या बरोबरीनं बसता येऊ लागलं.
• अस्पृश्यांसाठी त्यांनी गादीचे कारखाने, वाजंत्री (बॅंड) पथकं, उपाहारगृह सुरु केली.
• अनेक आंतरजातीय विवाह लावले.
• धर्मांतर केलेले हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली.
• सावरकरभक्त भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदीरात अस्पृश्यांना नुसता मंदीर प्रवेशच नाही तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष कोणत्या वर्षी होते ?
स्वातंत्र्यवीर सावरकर 1937 ते 1943 पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष होते.
मृत्यू :
26 फेब्रुवारी 1966 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा धगधगता अंगार शांत झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या साहित्यांपैकी काही प्रमुख साहित्य :
• सागरा प्राण तळमळला (कविता)
• हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
• जयोस्तुते
• माझी जन्मठेप (आत्मचरित्र)
• भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (ग्रंथ)
• 1857 चे स्वातंत्र्यसमर (The Indian War of Independence, 1857)
• हिंदुत्व : हिंदू कोण ? (Hindutva: Who Is a Hindu?)