
चालू घडामोडी 25, फेब्रुवारी 2025 | नयनामृतम 2.0 म्हणजे काय ? | What is Nayanamritham 2.0 ?

नयनामृतम 2.0 म्हणजे काय ?
What is Nayanamritham 2.0 ?
Subject : GS - सरकारी योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'नयनामृतम 2.0' हा जगातील पहिला सरकारी AI-संचालित डोळ्यांची तपासणी कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारचा उपक्रम आहे ?
1. महाराष्ट्र
2. तामिळनाडू
3. आंध्र प्रदेश
4. केरळ
उत्तर : केरळ
बातमी काय आहे ?
• केरळ सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहाय्यित दीर्घकालीन डोळ्यांच्या आजारांची तपासणी कार्यक्रम 'नयनामृतम 2.0' सुरू केला आहे.
• हा केरळ सरकारने सुरू केलेला हा जगातील पहिला सरकारी AI संचालित डोळ्यांची तपासणी कार्यक्रम आहे.
'नयनामृतम 2.0' कार्यक्रमाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• केरळ सरकारने रेमिडिओ हेल्थ-टेक कंपनीच्या सहकार्याने नयनामृतम 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे.
• केरळ सरकार डोळ्यांच्या आजाराच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे च Artificial Intelligence (AI) चा वापर करणारी जगातील पहिली सार्वजनिक आरोग्य प्रणाली ठरली आहे.
• त्याची पहिली आवृत्ती कुटुंब आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेह रेटिनोपॅथीच्या तपासणीवर केंद्रित होती.
• नयनामृतम 2.0 मुळे डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) सोबत काचबिंदू (Glaucoma) आणि वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन (Age-related Macular Degeneration) सारखे आजार ओळखणे देखील शक्य होईल.
नयनामृतम 2.0 चे उद्दिष्ट काय आहे ?
• सुरुवातीच्या टप्प्यातच गंभीर डोळ्यांचे आजार शोधणे आहे.
• उच्च-जोखीम असलेल्या डोळ्यांचे आजार लवकर ओळख आणि योग्य उपचार प्रदान करणे.
• टाळता येण्याजोगे अंधत्व कमी करणे.
• हे नयनामृतम 2.0 उपक्रमाचे उद्दिष्ट्ये आहे.
डोळ्यांचे आजार :
वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन (Age-related Macular Degeneration) म्हणजे काय ?
• आपल्या डोळ्यांच्या पडद्याला रेटिना असं म्हणतात. त्यावर मॅक्युला नावाचा छोटा बिंदू असतो.
• वयोमानानुसार रेटीना आतून हळूहळू झिजू लागतो, पर्यायानं मॅक्युला देखील झिजू लागतो.
• त्यामुळे रेटिना आणि मॅक्युलाचे कार्यान्वयन बिघडते.
• त्यामुळे यामुळे रुग्णाला वाचण्यात, लिहिण्यात, चेहरे ओळखण्यात आणि स्पष्टपणे पाहण्यात अडचण येते.
• तसेच दृष्टी कमी होत जाते.
काचबिंदू (Glaucoma) म्हणजे काय ?
• डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते.
• डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात.
• जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.
डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) म्हणजे काय ?
• मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन जी स्थिती निर्माण होते त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात.
• डोळ्याच्या मागील बाजूस प्रकाश-संवेदनशील उतीमधील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचल्याने असे होते.