
चालू घडामोडी 24, फेब्रुवारी 2025 | राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती | Rashtrasant Gadge Maharaj Jayanti

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती
Rashtrasant Gadge Maharaj Jayanti
" देव दगडात नाही माणसात आहे " हा विचार समाजात रुजवणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - इतिहास - संत, महाराष्ट्रातील समाजसुधारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संत गाडगे महाराजांनी काही वाईट सामाजिक रूढींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी _____ हे जनसंवादाचे पारंपारिक माध्यम वापरले.
(MPSC 2017)
1. आख्यान
2. आरती
3. कथा
4. कीर्तन
उत्तर : कीर्तन
संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?
• गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला.
संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय ?
(सरळसेवा भरती, रायगड पोलीस भरती 2017)
• संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.
• अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असल्यामुळे लोकांमध्ये ते ‘ गोधडे महाराज ’ किंवा ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच प्रसिद्ध आहेत.
• ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत.
• सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने प्रयत्न केले.
समाजसुधारणेसाठी कीर्तनाचे माध्यम :
• समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
• ‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत.
• त्यांनी मानवतेची सेवा आणि सहानुभूती यासारख्या मूल्यांवर जोर दिला.
• आपल्या कीर्तनांदरम्यान त्यांनी लोकांना अंधश्रद्धा आणि रूढींविरुद्ध प्रबोधन केले.
• महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली.
• गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली.
संत गाडगे महाराजांचे शेवटचे किर्तन कोणत्या ठिकाणी झाले ?
• 14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले.
संत गाडगे महाराजांचे निधन केव्हा झाले ?
• 20 डिसेंबर 1956 रोजी पेढी नदीच्या काठावर, वलगाव (अमरावती) येथे त्यांचे निधन झाले.
• गाडगेनगर, अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.
महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान केव्हा सुरू केले ?
• गाडगेबाबा यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.