
चालू घडामोडी 22, फेब्रुवारी 2025 | "वुमन ऑफ द इयर" 2025 | TIME’s Women of the Year 2025

"वुमन ऑफ द इयर" 2025
TIME’s Women of the Year 2025
Subject : GS - पुरस्कार, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) टाईम मासिकाच्या "वुमन ऑफ द इयर" २०२५ च्या यादीत खालील पैकी कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे ?
1. डॉ. पूर्णिमा देवी बर्मन
2. रोशनी नादर मल्होत्रा
3. श्रीमती निर्मला सीतारमण
4. किरण मुजुमदार
उत्तर : डॉ. पूर्णिमा देवी बर्मन (Dr Purnima Devi Barman)

बातमी काय आहे ?
• अलिकडेच, आसामच्या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांचा टाईम मासिकाच्या "वुमन ऑफ द इयर" 2025 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
• मासिकाच्या यादीत समाविष्ट झालेल्या जगातील 13 महिलांपैकी त्या एक आहेत.
डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांना "वुमन ऑफ द इयर" 2025 च्या यादीत समावेश का करण्यात आले ?
डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांना कोणत्या कामासाठी ओळखले जाते ?
• डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांचा, हरगिला किंवा ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क (Greater Adjutant Storks) आणि त्याच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या यादीत समावेश करण्यात आला आहे.
• डॉ. बर्मन यांनी आसाममधील हरगिला पक्षी आणि त्याच्या परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक लोकांना, विशेषतः महिलांना संघटित केले.
• त्यातूनच ‘हार्गिला आर्मी’ (Hargila Army) ही संघटना उभी राहिली.
• पक्ष्यांची घरटी वाचविणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे आणि या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती अशी कामे त्या संघटनेमार्फत केली जातात.
• या कामासाठी त्यांना देशातील सर्वोच्च नारीशक्ती सन्मान (2017)
• चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार (2022)
• तसेच ‘ग्रीन ऑस्कर’ मानला जाणारा व्हिटली पुरस्कार (2024), अशा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
टाईम मॅगझिन बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• टाईम मॅगझिन ही 1923 मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन मीडिया कंपनी आहे.
• न्यूयॉर्क येथील या मीडिया कंपनीची सुरुवात साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून झाली.
• ही आता एक जागतिक मल्टी-मीडिया कंपनी आहे.