
चालू घडामोडी 21, फेब्रुवारी 2025 | 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
Subject : GS - साहित्य संमेलन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 मध्ये झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
1. श्री शरद पवार
2. श्री जयंत नारळीकर
3. डॉ. तारा भवाळकर
4. श्री रितेश देशमुख
उत्तर : डॉ. तारा भवाळकर
बातमी काय आहे ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.
• तब्बल 71 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले आहे.
• श्री शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
• तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?
• 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले.
• 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी हे संमेलन होणार आहे.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
• 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर या आहेत.
• डॉ. तारा भवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचा अभ्यास, लेखन, संशोधन आणि चिंतन यामध्ये व्यतीत केलं असून त्यांनी 36 पेक्षा जास्त पुस्तकं लिहीली आहेत.
• लेखनकार्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आणि केव्हा पार पडले ? त्याचा हेतू काय होता ?
• ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या सहकार्याने 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले.
• याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
• पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते.