
चालू घडामोडी 19, फेब्रुवारी 2025 | मत्स्य 6000 म्हणजे काय ? | What is Matsya 6000 ?

मत्स्य 6000 म्हणजे काय ?
What is Matsya 6000 ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'मत्स्य 6000' कोणत्या संस्थेद्वारे विकसित केले जात आहे ?
1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
2. राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था (NIOT)
3. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO)
4. लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro)
उत्तर : राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था (NIOT)
बातमी काय आहे ?
अलिकडेच, भारताच्या चौथ्या जनरेशनमधील गहन समुद्रात काम करू शकणाऱ्या मत्स्य-6000 या पाणबुडीने पाण्यामधली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली.
मत्स्य 6000 काय आहे ?
• मत्स्य 6000 ही भारताची खोल समुद्रातील पाणबुडी आहे जी महासागराच्या शोधासाठी, विशेषतः खोल समुद्रातील खाणकाम आणि जैवविविधता अभ्यासासाठी डिझाइन केलेली आहे.
• मत्स्य 6000 ही समुद्रयान प्रकल्पाचा भाग आहे.
• मत्स्य-6000 ही पाणबुडी राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेने (National Institute of Ocean Technology) तयार केली आहे.
मत्स्य 6000 पाणबुडी बद्दल थोडक्यात माहिती :
• मत्स्य-6000 ही चौथ्या पिढीतील खोल -सागरात काम संशोधन करण्यासाठी तयार केलेली पाणबुडी आहे.
• मत्स्य-6000 या पाणबुडी गोलाकार असून तीचा व्यास 2.1 मीटरचा आहे.
• या पाणबुडीमध्ये तीन व्यक्ती सामावू शकतील.
• या पाणबुडी अंतर्गत, सागरी शोध आणि निरीक्षणासाठी वैज्ञानिक सेन्सर्सच्या संचासह तीन लोकांना समुद्रात 6000 मीटर खोलीवर नेले जाणार आहे.
मत्स्य 6000 पाणबुडी नेमकं काय काम करेल ?
मत्स्य 6000 मुळे काय फायदा होईल ?
• याद्वारे खोल समुद्रात विविध प्रकारचे वैज्ञानिक संशोधन आणि शोध घेतले जातील.
• याअंतर्गत, खोल समुद्रात असलेल्या सजीव आणि निर्जीव संसाधनांचा शोध घेतला जाईल.
• यामध्ये जैवविविधतेचा अभ्यास, खनिज संसाधनांचे सर्वेक्षण आणि सागरी पर्यावरणाचा अभ्यास यांचा समावेश आहे.
• या माहितीच्या आधारे खोल समुद्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास केला जाईल.
समुद्रयान मिशन काय आहे ?
• खोल महासागरात शोध घेण्यासाठी ही भारतातील पहिली मानवयुक्त मोहीम आहे.
• हा प्रकल्प केंद्र सरकारच्या ब्लू इकॉनॉमी धोरणाला पाठिंबा देणाऱ्या मोठ्या डीप ओशन मिशनचा एक भाग आहे.
• भूविज्ञान मंत्रालय (Ministry of Earth Sciences) अंतर्गत हे मिशन आहे.