
चालू घडामोडी 15, फेब्रुवारी 2025 | सामाजिक विकास आयोगाचे 63 वे सत्र | 63rd Session of the Commission for Social Development

सामाजिक विकास आयोगाचे 63 वे सत्र
63rd Session of the Commission for Social Development
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सामाजिक विकास आयोगाचे 63 वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले ?
1. भारत
2. अमेरिका
3. रशिया
4. चीन
उत्तर : अमेरिका
बातमी काय आहे ?
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित सामाजिक विकास आयोगाच्या 63 व्या सत्रात भारत सहभागी झाला.
सामाजिक विकास आयोगाच्या 63 व्या सत्रा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री डॉ. सावित्री ठाकूर यांनी यात भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले.
• राज्यमंत्री डॉ. सावित्री ठाकूर यांनी "एकजूटता आणि सामाजिक सुसंवाद मजबूत करणे" या प्राधान्य संकल्पनेला संबोधित करताना मंत्रीस्तरीय मंचावर भारताकडून निवेदन दिले.
• सर्वसमावेशक सामाजिक धोरणे राबवत जागतिक स्तरावर सामाजिक कल्याणाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून महत्वाच्या सामाजिक विकास मुद्द्यांवर चर्चा आणि भागीदारीला प्रोत्साहन देणे हे या सत्राचे उद्दिष्ट आहे.

सामाजिक विकास आयोग (Commission for Social Development) म्हणजे काय ?
• सामाजिक विकास आयोग हे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे (UN Economic and Social Council) एक प्रमुख आयोग आहे.
• सामाजिक विकास आयोग, सामाजिक विकासाशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रमांवर चर्चा करते आणि त्यासंदर्भात शिफारसी करते.
सामाजिक विकास आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सामाजिक विकास आयोगाची स्थापना केली.
सामाजिक विकास आयोगाचे उद्दिष्ट काय आहे ?
सामाजिक विकास आयोग काय काम करते ?
• सामाजिक विकास आयोगाचे मुख्य उद्दिष्ट जागतिक स्तरावर अधिक समावेशक आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देणे हे आहे.
• सामाजिक विकास आयोग हे गरिबी निर्मूलन, बेरोजगारी, सामाजिक समावेशन आणि शाश्वत विकास यासारख्या सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर धोरणे तयार करते.