
चालू घडामोडी 14, फेब्रुवारी 2025 | ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ब्रँड अॅम्बेसेडर कोण ? | Who is brand ambassador of the ICC Champions Trophy ?

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ब्रँड अॅम्बेसेडर कोण ?
Who is brand ambassador of the ICC Champions Trophy ?
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा राजदूत म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
1. युवराज सिंग
2. महेंद्रसिंग धोनी
3. गौतम गंभीर
4. शिखर धवन
उत्तर : शिखर धवन

बातमी काय आहे ?
• ICC ने शिखर धवनला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा राजदूत (ब्रँड अॅम्बेसेडर) हे मानाचे पद दिले आहे.
• सलग दोन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांमध्ये गोल्डन बॅट जिंकणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू असल्याचा अनोखा मान त्याच्याकडे आहे.
• 2013 आणि 2017 च्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये त्याने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ही कामगिरी केली.
• आगामी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान पाकिस्तान आणि UAE येथे होणार आहे.
2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक कोण ?
• पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हे 2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक देश आहेत.
• सुरुवातीला, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन एकट्याने करणार होता,
• परंतु भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे, भारताचे सर्व सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे.
• यामुळे संयुक्त अरब अमिरातीला स्पर्धेचे सह-यजमानपद देण्यात आले.
• 2008 पासून, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाऊन खेळला नाही.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये किती देश सहभागी होत आहेत ?
• ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 देश सहभागी होत आहेत.
• भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा राजदूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
• भारताचा शिखर धवन
• पाकिस्तानचा सरफराज अहमद
• ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन
• न्यूझीलंडचा टिम साउथी
हे 4 जण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.