
चालू घडामोडी 12, फेब्रुवारी 2025 | नवीन रेल्वे झोन कोणता ?

नवीन रेल्वे झोन कोणता ?
New Railway Zone
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वे अंतर्गत कोणत्या नवीन रेल्वे झोनच्या निर्मितीला मान्यता दिली ?
- दक्षिण तटीय रेल्वे झोन
- पूर्व तटीय रेल्वे झोन
- पश्चिम तटीय रेल्वे झोन
- उत्तर तटीय रेल्वे झोन
उत्तर : दक्षिण तटीय रेल्वे झोन (South Coast Railway Zone)
बातमी काय आहे ?
• केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वे अंतर्गत दक्षिण तटीय रेल्वे झोन (South Coast Railway Zone) या नवीन रेल्वे क्षेत्राच्या निर्मितीला मान्यता दिली.
• आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार हे नवीन रेल्वे झोन स्थापन केले जात आहे, ज्यामुळे रेल्वे कामकाजात कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.
भारताचा 18वा रेल्वे झोन कोणता ?
• भारताचा 18वा रेल्वे झोन, दक्षिण तटीय रेल्वे झोन आहे.
• 7 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा रेल्वे झोन मंजूर केला.
• दक्षिण तटीय रेल्वे झोन, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 अंतर्गत तयार करण्यात आला.
दक्षिण तटीय रेल्वे झोनचे मुख्यालय कोणते ?
आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम हे दक्षिण तटीय रेल्वे झोनचे मुख्यालय असेल.
भारतात किती रेल्वे झोन आहे ?
• भारतीय रेल्वेचे जाळे 18 झोनमध्ये विभागलेले आहे.
• झोन पुढे विभागांमध्ये विभागलेले आहेत.
• प्रत्येक झोनचे स्वतःचे मुख्यालय आहे.
• याव्यतिरिक्त, मेट्रो रेल्वे हा 19 वा झोन आहे, जो स्वतंत्रपणे कार्यरत आहे.
List of Indian Railways Zones and their Headquarters :

नोट : याव्यतिरिक्त मेट्रो रेल्वे चे स्वतंत्र मुख्यालय असून ते कोलकाता येथे आहे.
भारतीय रेल्वे क्षेत्रांची आणि त्यांच्या मुख्यालयांची यादी :

नोट : याव्यतिरिक्त मेट्रो रेल्वे चे स्वतंत्र मुख्यालय असून ते कोलकाता येथे आहे.