
चालू घडामोडी 10, फेब्रुवारी 2025 | एरो इंडिया 2025 काय आहे ? | Aero India 2025 ?

एरो इंडिया 2025 काय आहे ?
Aero India 2025 ?
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) एरो इंडिया 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले ?
1. नवी दिल्ली
2. मुंबई
3. हैदराबाद
4. बंगळुरू
उत्तर : बंगळुरू
बातमी काय ?
आशियातील सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शनाचे नुकतेच भारतात आयोजन करण्यात आले.
Aero India - एरो इंडिया प्रदर्शना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• एरो इंडिया 2025 ही एरो इंडियाची 15 वी आवृत्ती आहे.
• कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान एरो इंडिया 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
• या कार्यक्रमात विविध देशांचे संरक्षण मंत्री, प्रतिनिधी आणि लष्करी अधिकारी सहभागी होत आहेत.
Aero India - एरो इंडिया 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ ही यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे.
‘The Runway to a Billion Opportunities’
Aero India - एरो इंडिया प्रदर्शनाचे आयोजन कोण करते ?
संरक्षण प्रदर्शन संघटना, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येते.
Aero India - एरो इंडिया प्रदर्शनाचे आयोजन किती वर्षांनी करण्यात येते ?
एरो इंडिया प्रदर्शन दर 2 वर्षांनी, बंगळुरू येथे आयोजित केले जाते.
Aero India - एरो इंडिया प्रदर्शनाचा फायदा काय ?
एरो इंडिया हे केवळ प्रदर्शन नव्हे, तर भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन : या उपक्रमात नियमितपणे अत्याधुनिक एरोस्पेस सिस्टीम, नाविन्यपूर्ण संरक्षण उपाय तसेच हवाई आणि अंतराळ प्रवासाच्या भविष्याला आकार देणाऱ्या यशस्वी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवली जातात.
धोरणात्मक संवादांना चालना देणे : उच्च-स्तरीय तज्ज्ञांच्या संवादांद्वारे, एरो इंडियाने धोरण, संरक्षण सहयोग आणि एरोस्पेस क्षेत्राच्या भविष्यातील आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एक क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे.
आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवणे : जागतिक एरोस्पेस विषयांतील दिग्गज व संरक्षण एजन्सींच्या सहभागासह, हा शो आंतरराष्ट्रीय एरोस्पेस समुदायातील एक प्रमुख प्रदर्शन म्हणून भारताचा विकसित होणारा दर्जा अधोरेखित करतो.