
चालू घडामोडी 08, फेब्रुवारी 2025 | मखाना बोर्ड | Makhana Board

मखाना बोर्ड
Makhana Board
Subject : GS - भूगोल, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये केलेल्या घोषणे नुसार कोणत्या राज्यात मखाना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. मध्य प्रदेश
4. बिहार
उत्तर : बिहार
बातमी काय आहे ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये बिहारमध्ये मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मखाना म्हणजे काय ?
- युरियाल फेरॉक्स नावाच्या वॉटर लिलीच्या बिया, त्याला मखाना, फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
- मखान्यामध्ये प्रथिने आणि फायबर असतात, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असतो.
- त्यामुळं याला 'सुपरफूड' म्हणूनही ओळखलं जातं.
मखाना पीक लागवडीसाठी हवामान परिस्थिती कोणती ?
- तापमान (Temperature) : 20 ते 35 °C
- पाऊस (Rainfall) : 100 ते 250 सेमी
- आर्द्रता (Humidity) : 50 ते 90%
भारतात मखानाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
- भारतात मखानाचे सर्वाधिक उत्पादन बिहारमध्ये होते.
- बिहारमध्ये भारतातील 90% मखाना तयार होतो.
मखाना मंडळाची उद्दिष्टे कोणती ?
What are Key Objectives of the Makhana Board ?
उत्पादन वाढवणे (Enhancing Production) :
- उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी वैज्ञानिक शेती तंत्रांना प्रोत्साहन देणे.
संशोधन आणि विकास (Research & Development) :
- बियाण्यांच्या चांगल्या जाती आणि कीटक नियंत्रण पद्धतींसाठी ICAR आणि विद्यापीठांसारख्या संस्थांशी सहयोग करणे.
शेतकऱ्यांना सहाय्य (Farmer Support) :
- शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता प्रदान करणे.
मार्केटिंग आणि निर्यात प्रोत्साहन (Marketing & Export Promotion) :
- मखाना पुरवठा साखळी मजबूत करणे आणि शेतकऱ्यांना चांगले भाव मिळण्यास मदत करणे.
प्रक्रिया आणि मूल्यवर्धन (Processing & Value Addition) :
- भाजलेले मखाना, मखाना खीर आणि मखाना पीठ यांसारख्या मखाना-आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देणे.
सबसिडी आणि कर्ज (Subsidies & Loans) :
- मखाना प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक सहाय्य देणे.
मखानानॉमिक्स म्हणजे काय ?
What is Makhananomics ?
- 2025-26 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारमध्ये 'मखाना बोर्ड' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याच कारणास्तव माखानॉनॉमिक्स हा शब्द चर्चेत आहे.
- मखानानॉमिक्स म्हणजे मखानाशी संबंधित अर्थव्यवस्था, ज्यामध्ये मखाना उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि मार्केटिंग संबंधित आर्थिक घडामोडींचा समावेश आहे.
- एका संशोधन अंदाजानुसार, सध्या भारतातील मखाना बाजारपेठ सुमारे 8 अब्ज रुपयांची आहे.
- मार्केट रिसर्च कंपनी IMARC च्या अहवालानुसार, 2032 पर्यंत मखानाची बाजारपेठ सुमारे 19 अब्ज रुपयांची होईल.