
चालू घडामोडी 05, फेब्रुवारी 2025 | संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून कोणता देश बाहेर पडला ?

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून कोणता देश बाहेर पडला ?
Which country withdrawal from UNHRC ?
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली ?
1. फ्रान्स
2. रशिया
3. चीन
4. अमेरिका
उत्तर : अमेरिका
बातमी काय आहे ?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी UNHRC मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
- यासाठी त्यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
- ज्यामध्ये देशाने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याचा आणि पॅलेस्टाईनमधील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि कार्य एजन्सीला (UNRWA) अमेरिकेकडून दिला जाणारा निधी बंद करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(United Nations Human Rights Council )
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली ?
- संयुक्त राष्ट्र महासभेने 2006 मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना केली होती.
- UNHRC मध्ये 47 सदस्य राष्ट्रे असतात, जी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेद्वारे निवडली जातात.
- या परिषदेचे सदस्य प्रादेशिक गटाच्या आधारावर 3 वर्षांसाठी निवडून येतात.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
- या परिषदेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा (Geneva) येथे आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे उद्दिष्ट काय आहे ?
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद काय काम करते ?
- जगभरातील मानवी हक्कांचे संरक्षण करणे, मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करणे आणि ते रोखण्यासाठी पावले उचलणे.
- शिक्षण, जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे.
- युद्ध, संघर्ष आणि इतर संकटांच्या वेळी मानवी हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करणे.
- सदस्य राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या नोंदींचे नियमितपणे पुनरावलोकन करणे तसेच त्यासंदर्भात सदस्य राष्ट्रांचा आढावा घेणे.