
चालू घडामोडी 04, फेब्रुवारी 2025 | जागतिक कर्करोग दिन | World Cancer Day

जागतिक कर्करोग दिन
World Cancer Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 30 जानेवारी
2. 4 फेब्रुवारी
3. 8 मार्च
4. 7 एप्रिल
उत्तर : 4 फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिवस आणि कर्करोगा बद्दल परीक्षेसाठी IMP नोट्स :
- दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
- कर्करोग हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. हा या दिनाचा उद्देश आहे.
2025 च्या जागतिक कर्करोग दिनाची संकल्पना (थीम) काय आहे ?
- 2025 च्या जागतिक कर्करोग दिनाची थीम 'युनायटेड बाय युनिक' (United by Unique) आहे.
- ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक काळजी आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करते.
जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो ?
- 2000 मध्ये पॅरिसमध्ये कर्करोगाविरुद्ध एक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
- 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिसच्या कर्करोगाविरुद्धच्या चार्टरवर स्वाक्षरी करण्यात आली.
- तेव्हापासून जागतिक कर्करोग जागरूकता दिन 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात सुरूवात झाली.
- या कार्यक्रमात अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय नेते सहभागी झाले होते.
कर्करोग दिवस साजरी का करण्यात येतो ?
- कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.
- कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
- जगभरात, 6 पैकी 1 मृत्यू कर्करोगामुळे होतो.
- कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल लोकांमध्ये जागरूक निर्माण करण्यासाठी
- लोकांना वेळेवर तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी
- कर्करोगाची भीती कमी करण्यासाठी
कर्करोग (कॅन्सर) म्हणजे काय ?
What is Cancer ?
- जागतिक आरोग्य संघटने नुसार, कर्करोग हा रोगांचा एक मोठा समूह आहे, जो शरीराच्या जवळजवळ कोणत्याही अवयव किंवा ऊतींमध्ये सुरू होऊ शकतो.
- यामध्ये, पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि सामान्य मर्यादेपलीकडे जातात आणि शरीराच्या आसपासच्या भागांवर आक्रमण करतात.
कर्करोगाची (कॅन्सर ची) प्रमुख लक्षणे कोणती ?
- वेगाने वजन कमी होणे
- सातत्याने येणारा खोकला
- रक्तस्त्राव
- रक्ताच्या गाठी येणे
- कायम थकवा जाणवने
- पोटात दुखणे इत्यादी.
भारतातील कर्करोगाचे सर्वात सामान्य प्रकार कोणते ?
- स्तनाचा कर्करोग
- तोंडाचा कर्करोग
- फुफ्फुसाचा कर्करोग
- घशाचा कर्करोग इत्यादी.
कर्करोगाचा उपचार कसा शक्य आहे ?
- कर्करोग व्यक्तीच्या शरीरात किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे, कर्करोगाचा विकार कोणता यावर कर्करोगाचा उपचार अवलंबून असतो.
- रसायनोपचार (Chemotherapy), इम्युनोथेरपी, किरणोत्सर्गी उपचार (Radiotherapy), शल्य चिकित्सा (Surgery) इत्यादी उपचाराचे पर्याय कर्करोगाच्या उपचारात वापरले जातात.
- कर्करोगावरील उपचार पद्धती ही रुग्णाच्या आरोग्यावरही अवलंबून असते.
- कर्करोगाचे सुरुवातीलाच निदान केले तर तो सहज बरा होऊ शकतो.
कर्करोगाची कारणे कोणती ?
- तंबाखू सेवन : तंबाखूचे सेवन, धूम्रपान हे भारतातील कर्करोगासाठी जबाबदार सर्वात मोठे कारण आहे.
- सरकारी आकडेवारी नुसार, पुरुषांमध्ये अंदाजे 40 ते 50 टक्के आणि महिलांमध्ये 20 टक्के कर्करोग हा तंबाखूमुळे होतो.
- अल्कोहोल
- आवश्यक पोषण आहाराची कमतरता
- निष्क्रिय राहणीमान
- किरणोत्सर्गी संपर्क - आयनीभवन करू शकणाऱ्या विकिरणामुळे उदाहरणार्थ, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे,
- विषारी रसायनांच्या संपर्कात काम करणे.
कर्करोग प्रतिबंधात्मक (टाळण्यासाठीचे) उपाय कोणते ?
- सकस आहार घेणे
- नियमित व्यायाम करणे
- तंबाखू-दारू टाळावे
- वेळोवेळी नियमित तपासणी करणे ; इत्यादी
नोट :
- दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
- दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो.