गांजाची शेती
Cannabis Cultivation
Subject : GS -विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यशास्त्र - कायदे
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, खालील पैकी कोणत्या राज्याने गांजा/भांग लागवडीसाठी एक पायलट प्रकल्प मंजूर केला आहे ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. कर्नाटक
4. हिमाचल प्रदेश
उत्तर : हिमाचल प्रदेश
गांजा लागवड, NDPS ॲक्ट यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अलिकडेच हिमाचल प्रदेश सरकारने गांजा/भांग लागवडीसाठी एक पायलट प्रकल्प मंजूर केला आहे.
• या निर्णयामुळे, हिमाचल प्रदेश हे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि मणिपूरसह वैद्यकीय आणि औद्योगिक कारणांसाठी गांजाच्या लागवडीला नियंत्रित परवानगी देणारे राज्य बनले आहे.
गांज्याची शेती करता येते का ?
• नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, 1985 (NDPS ॲक्ट) नुसार भारतात गांजा बेकायदेशीर आहे.
• NDPS कायद्यातील अलिकडच्या सुधारणांमुळे राज्यांना विशिष्ट परवाना आणि नियामक अटींनुसार औषधी आणि औद्योगिक उद्देशांसाठी गांजाच्या लागवडीसाठी कायदे करण्याची परवानगी मिळते.
• नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सब्सटेंसेस अक्ट, 1985 नुसार, राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
गांजाचे झाडा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• गांजाचे झाड हे साधारणपणे 1.5 मी. उंच, सरळ वाढणारे, एक वर्ष जगणारे, गंधयुक्त झुडूप आहे.
• भारतातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत हे पीक लागवडीत असून हिमालयात व मध्य आशियात रानटी अवस्थेत सापडते.
• सध्या, गांजा पिकाला 'ट्रिलियन डॉलर्स पीक' मानले जाते.
• गांजाचे वैज्ञानिक नाव कॅनाबिस सॅटिवा (Cannabis Sativa) असे आहे.
• गांज्याच्या झाडात दोन रसायनं आढळतात. एक आहे टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) आणि दुसरं म्हणजे कॅनाबिडॉल (CBD).
• THC मुळे गांज्यात नशा येते.
• भांग, गांजा व चरस हे एकाच प्रजातीच्या वनस्पती पासून बनवले जातात.
• गांजाचा वापर औषधे, आरोग्य सेवांमध्ये, लोकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी केला जातो.
भांग, गांजा व चरस यांमध्ये नेमका फरक काय ?

भांग : भांगाच्या झाडाच्या वाटलेल्या पानांपासून ‘भांग’ नावाचे मादक पेय पदार्थ बनवितात.

गांजा : स्त्री-फुलोरा (मादी वनस्पती पासून) वाळवून टोकाच्या भागापासून ‘गांजा’ मिळवितात व हातावर मळून तंबाखूबरोबर चिलिमीतून ओढतात; यालाच स्पॅनिश भाषेत ‘मरीव्हाना’ (मारिजुआना) म्हणतात.

चरस (हशिश) : पाने व फुलोऱ्यापासून काढलेली चिकट राळ वाळवून ‘चरस’ किंवा हशिश नावाचे द्रव्य काढतात.
भांग, गांजा व चरस यांचा शरीरावर परिणाम :
• भांग, गांजा व चरस ही गुंगी आणणारी द्रव्ये आहेत आणि त्यांच्या अतिसेवनाने अफू व अल्कोहॉलाप्रमाणे मेंदू आणि मज्जातंतूंवर वाईट परिणाम होतात.
• गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसन थांबून मृत्यू येऊ शकतो.
• भांग, गांजा व चरस हे नशेचे पदार्थ आहे, यांपासून दूर रहा.
अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (NPDS) कायदा, 1985 काय आहे ?
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985
NDPS कायदा एखाद्या व्यक्तीला योग्य अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचे उत्पादन/शेती/ताबा/विक्री/खरेदी/वाहतूक/स्टोअर/उपभोग करण्यास मनाई करतो.