
चालू घडामोडी 03, फेब्रुवारी 2025 | रामसर स्थळांच्या यादीत आणखी 4 पाणथळ जागा

रामसर स्थळांच्या यादीत आणखी 4 पाणथळ जागा
4 more wetland to the list of ramsar sites
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारतातील 4 स्थळांना रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिलेली रामसर स्थळे आणि संबंधित राज्यांची अयोग्य जोडी कोणती ?
1. उधवा तलाव = झारखंड
2. खेचेओपालरी पाणथळ प्रदेश = सिक्कीम
3. सक्काराकोट्टई पक्षी अभयारण्य = तामिळनाडू
4. थेरथंगल पक्षी अभयारण्य = कर्नाटक
उत्तर : थेरथंगल पक्षी अभयारण्य = कर्नाटक ही चुकीची जोडी आहे.
थेरथंगल पक्षी अभयारण्य हे तामिळनाडू राज्यात आहे.
बातमी काय आहे ?
- भारतातील आणखी 4 स्थळांना रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.
रामसर स्थळांबाबत परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- भारताने 4 नवीन रामसर स्थळे जोडली आहेत, त्यामुळे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या 89 झाली आहे.
- आशियामध्ये पहिला : भारत आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असलेला देश आहे.
- जगात तिसरा : युनायटेड किंग्डम (176) आणि मेक्सिको (144) नंतर भारत (89) रामसर स्थळे असलेला जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- पहिल्यांदाच, झारखंड आणि सिक्कीममधील पाणथळ स्थळांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
नवीन 4 रामसर स्थळे कोणती ? ती कोणत्या राज्यात आहे ?
- सक्काराकोट्टई पक्षी अभयारण्य (Sakkarakottai Bird Sanctuary) : तामिळनाडू
- थेरथंगल पक्षी अभयारण्य (Therthangal Bird Sanctuary) : तामिळनाडू
- खेचेओपालरी पाणथळ प्रदेश (Khecheopalri Wetland) : सिक्कीम
- उधुवा किंवा उधवा तलाव (Udhuwa or Udhwa Lake) : झारखंड
पाणथळ क्षेत्र (जागा) म्हणजे काय ?
- पाणथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पाणी हे पर्यावरण आणि संबंधित वनस्पती आणि प्राणी जीवन नियंत्रित करणारे प्राथमिक घटक आहे.
- पाणथळ जमीन हे एक भूभाग आहे जेथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडलेला असतो. अशा भागात जलीय वनस्पतीं मोठ्या प्रमाणात असतात.
पाणथळ क्षेत्र इतकी महत्त्वाची का असतात ?
- जलशुद्धीकरण, परिसंस्थांचे पुरापासून संरक्षण, जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा सामावून घेणे, त्यातील खनिजे विघटनाद्वारे मुक्त करून जीव-जंतूस उपलब्ध करून देणे, कार्बन डायऑक्साइड स्टोरी करणे अशी अतिमहत्त्वाचे कार्य करून पर्यावरणाचा समतोल पाणथळ क्षेत्रामुळे राखला जातो.
- त्याचबरोबर सृष्टि-वातावरण सौंदर्यात भर घालणे, पर्यटन स्थळे म्हणून आणि सामाजिक कार्यक्रमातही पाणथळ जागा महत्त्वाच्या ठरतात.
रामसर ठराव म्हणजे काय ?
रामसर स्थळ म्हणजे काय ?
- इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
- या ठरावा अंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात येते.
- हा ठराव 1975 सालापासून अंमलात आला.
- भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला.
- स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात किती रामसर स्थळे आहेत ?
उत्तर : 89 (फेब्रुवारी 2025 पर्यंत)
प्रश्न) भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये 20 रामसर स्थळे आहेत. (फेब्रुवारी 2025 पर्यंत)
प्रश्न) जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस ( World Wetland Day) केव्हा असतो ?
उत्तर : 2 फेब्रुवारी
- इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
प्रश्न) महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?
1. 3
2. 5
3. 7
4. 9
उत्तर : 3
1. लोणार सरोवर
2. नांदूर मध्यमेश्वर
3. ठाणे खाडी