
चालू घडामोडी 30, जानेवारी 2025 | समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Which was the first state in the country to implement UCC ?
Subject : GS - राज्यशास्त्र - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1. महाराष्ट्र
2. उत्तराखंड
3. गुजरात
4. उत्तर प्रदेश
उत्तर : उत्तराखंड
समान नागरी कायदा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• उत्तराखंड राज्यात 27 जानेवारी 2025 पासून समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे.
• स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले.
उत्तराखंड राज्यातील समान नागरी कायद्यामधील काही IMP तरतुदी :
लग्न आणि घटस्फोट :
• समान नागरी कायद्यानुसार पुरूष आणि स्त्रियांचे कायदेशीर लग्न करण्याचे वय अनुक्रमे 21 आणि 18 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.
• यासह सर्व धर्मांमध्ये घटस्फोटासाठी समान आधार आणि प्रक्रिया असेल.
पॉलिगॅमी (Polygamy) प्रथे वर बंदी :
समान नागरी कायद्याअंतर्गत पॉलिगॅमी(एकाच वेळी अनेक लग्नाच्या बायका किंवा पती असण्याची प्रथा) प्रथेला सर्व समुदायांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
विवाह नोंदणी :
कायद्याच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विवाहांची नोंदणी 60 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
लिव्ह-इन संबंधांची नोंदणी :
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर आता लिव्ह-इनसाठी कायदेशीर मान्यता आणि संरक्षण हवे असल्यास संबंधांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उत्तर अधिकारी आणि वारसा कायद्यांमध्ये बदल :
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाद कमी करण्यासाठी कायदेशीर वारसांची स्पष्टपणे ओळख पटवणे आवश्यक करण्यात आले असून त्यासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत.
समान नागरी कायदा म्हणजे काय ?
What is Uniform Civil Code ?
लग्न, घटस्फोट, वारसा, दत्तक घेणे इत्यादी वैयक्तिक बाबींवर देशभरातील सर्व धार्मिक समुदायांसाठी एकसमान कायदेशीर चौकट प्रस्तावित करणे.
समान नागरी कायद्यासाठी संविधानातील कोणत्या भागात तरतुदी करण्यात आल्या आहेत ?
संविधानाच्या भाग IV मधील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांच्या (Directive Principle of State Policy) कलम 44 मध्ये असे नमूद केले आहे की, भारताच्या संपूर्ण प्रदेशात समान नागरी संहिता लाभावी यासाठी राज्याकडून प्रयत्न केले जातील.
गोवा नागरी संहिता काय आहे ?
What is Goa Civil Code ?
• 1867 चा पोर्तुगीज नागरी कायदा गोव्यात राहणाऱ्या सर्व लोकांना लागू आहे.
• 1867 च्या पोर्तुगीज नागरी संहिता आता गोवा नागरी संहिता म्हणून ओळखली जाते.
• हे कलम 44 अंतर्गत हाताळले जात नाही परंतु त्याचे कार्य समान आहे.
• गोव्यात विवाह, वारसा आणि घटस्फोटाचे प्रकरण एकाच संहितेअंतर्गत हाताळले जातात.