
चालू घडमोडी 29, जानेवारी 2025 | गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ? | What is Guillain-Barre Syndrome (GBS) ?

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?
What is Guillain-Barre Syndrome (GBS) ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेला गुइलेन बॅरे सिंड्रोम खालील पैकी कोणत्या घटकावर प्रामुख्याने हल्ला करतो ?
1. डोळे
2. यकृत
3. हृदय
4. मज्जासंस्था
उत्तर : मज्जासंस्था (Nervous System)
बातमी काय आहे ?
• पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
• गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि आरोग्यविषयक व्यवस्थापन करण्यासाठी ही समिती महाराष्ट्र राज्य सरकारला मदत करेल.
Guillain-Barre Syndrome (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शोध कोणी आणि केव्हा लावला ?
या सिंड्रोमचे नाव फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गुइलेन (Georges Guillain) आणि जीन बॅरे (Jean Barré) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्यांनी 1916 मध्ये प्रथम या रोगाचे वर्णन केले.
Guillain-Barre Syndrome (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोम कशामुळे होतो ?
• हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारण 80 हजार लोकांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो आणि तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीत.
• तज्ञांच्या मते हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.
• सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं.
• बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर गुइलेन बॅरे सिंड्रोम होऊ शकतो.
Guillain-Barre Syndrome (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोम काय आहे ?
• हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (Neurological Disorder) आहे.
• एरवी परकीय विषाणू किंवा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते.
• परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत.
• त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात.
• गुइलेन बॅरे सिंड्रोम झालेल्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर (मज्जासंस्थेवर) आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो.
Guillain-Barre Syndrome (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे कोणती ?
• अशक्तपणा, हातपायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, जुलाब उलट्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे गुइलेन बॅरे सिंड्रोम ची प्राथमिक लक्षणे आहेत.
• लवकर उपचार न केल्यास पॅरालिसीस होऊ शकतो.
Guillain-Barre Syndrome (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोम उपचार :
• लवकर लक्षणं ओळखून लवकर उपचार घेणं सर्वोत्तम ठरतं आणि रुग्ण पूर्णपणे बरे होतात.
• वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडींचा शोध घेता येतो. तसेच त्यांच्यावरील औषधे देता येतात.
• प्लाझ्मा एक्स्चेंज (Plasma Exchange) म्हणून एक उपचाराचा प्रकार आहे. यात रक्त फिल्टर केलं जातं आणि रक्तातील शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकल्या जातात.