
चालू घडामोडी 27, जानेवारी 2025 | जागतिक कुष्ठरोग दिन | World Leprosy Day

जागतिक कुष्ठरोग दिन
World Leprosy Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 मध्ये, जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 12 जानेवारी
2. 26 जानेवारी
3. 2 फेब्रुवारी
4. 15 मार्च
उत्तर : 26 जानेवारी
2025 मध्ये जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.
• 2025 मध्ये, जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.
• भारतात हा दिवस 30 जानेवारी रोजी साजरी करण्यात येतो.
जागतिक कुष्ठरोग दिन का साजरी करण्यात येतो ?
• कुष्ठरोगाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी 'जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन' साजरा केला जातो.
• हा दिवस कुष्ठरोगाशी संबंधित कलंक आणि भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन करण्याची संधी आहे.
जागतिक कुष्ठरोग दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"एकजूट व्हा. कार्य करा. कुष्ठरोग निर्मूलन करा." ("Unite. Act. Eliminate.")
2025 ची ही संकल्पना (थीम) कुष्ठरोगाबद्दल जागरुकता वाढवणे, कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकणे आणि कुष्ठरोग दूर/ निर्मूलन करण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन सहकार्याने कृती करण्यावर जोर देते.
कुष्ठरोग कशामुळे होतो ?
• कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे.
• कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जिवाणूमुळे होतो.
• नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे जिवाणू प्रसारित केले जातात.
• हस्तांदोलन करणे किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे, एकत्र जेवण करणे किंवा एकमेकांच्या शेजारी बसणे यासारख्या अनौपचारिक संपर्कातून हा रोग पसरत नाही.
कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला ?
• इ.स. 1873 मध्ये नॉर्वेतील वैद्य गेरहार्ट हेन्रिक आरमौअर हान्सेन (Gerhard Henrik Armauer Hansen) यांना प्रथम ऊतींच्या नमुन्यात कुष्ठरोगाचे जीवाणू आढळले.
• या जीवाणूंमुळे कुष्ठरोग होतो, असे त्यांनी इ.स. १८७४ मध्ये सिद्ध केले.
• त्यांच्या या शोधामुळे कुष्ठरोगाला हान्सेन रोग (Hansen Disease) असेही म्हणतात.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे काय आहे ?
• त्वचेवर पांढरा किंवा लाल चट्टा दिसतो
• त्वचेची संवेदनक्षमता कमी होते.
• या रोगामुळे त्वचा जाड होऊन शरीराच्या विविध भागांवर गाठी वाढलेल्या दिसून येतात.
• हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
• परिणामी बोटे आणि पंजा आतील बाजूला वळतात.
महाराष्ट्रात कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आनंदवनाची स्थापना कोणी केली ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, MPSC, संयुक्त गट ब, गट क)
• महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्याची सेवा केली.
• महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा गावाजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली.
• कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले.
कुष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश कोणता ?
• कुष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश जॉर्डन आहे.
• वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अधिकृतपणे जॉर्डन या देशाचा कुष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश म्हणून पुष्टी केली आहे.