
चालू घडामोडी 25, जानेवारी 2024 | हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम | "Hamara Samvidhan Hamara Swabhiman"

हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम
"Hamara Samvidhan Hamara Swabhiman"
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम केव्हा सुरू करण्यात आली ?
1. 26 जानेवारी 2023
2. 24 जानेवारी 2024
3. 15 ऑगस्ट 2024
4. 26 नोव्हेंबर 2024
उत्तर : 24 जानेवारी 2024
बातमी काय आहे ?
• देशभरात गेले वर्षभर हमारा संविधान हमारा सन्मान ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली.
• या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम केव्हा सुरू करण्यात आली ?
24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते 'हमारा संविधान हमारा सन्मान' मोहिम सुरू करण्यात आली.
हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम काय आहे ?
हमारा संविधान हमारा सन्मान मोहीमेचे उद्दिष्ट कोणते ?
• "हमारा संविधान हमारा सन्मान" ही मोहीम भारतीय राज्यघटना, त्याचा इतिहास आणि आजच्या जगामध्ये त्याची प्रासंगिकता याबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
• भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान ही मोहीम सुरू केली होती.
• 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान देण्यासाठी
• भारताच्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष आणि राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू केली गेली होती.