
चालू घडामोडी 24, जानेवारी 2025 | कर्पूरी ठाकूर | Karpoori Thakur

कर्पूरी ठाकूर
Karpoori Thakur
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
जननायक कर्पूरी ठाकूर यांना जयंती दिनी मानवंदना 🙏💐💐
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 मध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ते खालील पैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?
1. महाराष्ट्र
2. राजस्थान
3. बिहार
4. मध्य प्रदेश
उत्तर : बिहार
जननायक कर्पूरी ठाकूर यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
‘भारतरत्न’ कर्पूरी ठाकूर कोण आहेत ?
जन्म :
जननायक कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहार च्या समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया (आताचे कर्पूरीग्राम) गावात झाला.
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि सामाजिक कार्य :
• ‘ भारत छोडो ’ आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडले.
• स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यामुळे त्यांनी 26 महिने तुरुंगात काढले.
• देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
• मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात.
• भारतरत्न’ कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणतात.
मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर :
• बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे.
• बिहारच्या राजकारणात त्यांना गरिबांचा सर्वात मोठा आवाज मानलं जायचं.
• जननायक कर्पूरी ठाकूर यांनी बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविले.
• ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते.
• 1967 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इंग्रजीची अट रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्यांच्यामुळेच शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली.
• 1971 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी जमिनींवरील महसूल कर बंद केला.
• आर्थिकदृष्ट्या गरीब मुलांच्या शाळेची फी माफ करण्याचं कामही त्यांनी केलं.
• बिहार राज्यात मॅट्रिकपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा जननायक कर्पूरी ठाकूर यांनी केली, असा निर्णय घेणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते.
• मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू केले.
• मुंगेरीलाल आयोगाच्या शिफारशीवरून त्यांनी मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षणाची व्यवस्था लागू केली.
मृत्यू :
जननायक कर्पूरी ठाकूर यांचं 17 फेब्रुवारी 1988 रोजी, वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
भारतरत्न पुरस्कार :
2024 मध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.