
चालू घडामोडी 23, जानेवारी 2025 | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती | Netaji Subhas Chandra Bose

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
Netaji Subhas Chandra Bose
नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 💐💐🙏
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी देशात पराक्रम दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 15 ऑगस्ट
2. 23 जानेवारी
3. 26 जानेवारी
4. 1 मे
उत्तर : 23 जानेवारी
पराक्रम दिन केव्हा आणि का साजरी केला जातो ?
• नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मरणार्थ 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो.
• 2021 मध्ये भारत सरकारने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
• तरुणांमध्ये देशभक्ती जागरूक करणे तसेच आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निडरता, सामर्थ अशा गुणांची जोपासना करण्याच्या उद्देशाने पराक्रम दिन साजरा केला जातो.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म आणि शिक्षण :
• नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओडिशातील कटक येथे झाला.
• लहानपणापासूनच त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता. "माणुसकी हाच खरा धर्म " यावर त्यांची नितांत श्रद्धा होती.
• त्यांनी तत्त्वज्ञान विषयात BA चे शिक्षण घेतले.
• 1920 साली वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी इंडियन सिविल सर्विस सेवा (ICS) उत्तीर्ण केली परंतु परकीय सत्तेची सेवा न करण्याच्या निश्चयामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःला देशसेवेच्या कार्यात वाहून घेतले.
स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग आणि काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :
• 1930 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
• 1938 मध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले.
• 1939 मध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची पुन्हा निवड झाली. गांधीजीं बरोबर असलेल्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी राजीनामा दिला.
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली ?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची नजर कैदेतून सुटका :
• ब्रिटिश नजर कैदेतून पठाणाच्या वेशात ते निसटले व पेशावर,काबुल,मॉस्को (रशिया), रोम मार्गे ते जर्मनीत बर्लिन येथे पोहोचले.
• बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ चालविला, या आकाशवाणी वरून त्यांनी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले.
• बर्लिन येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली.
आझाद हिंद सेना आणि हंगामी सरकारची स्थापना :
• दुसऱ्या महायुद्धात पकडलेल्या ब्रिटिश भारतीय सैनिकांची सुटका करून त्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले.
• 21 ऑक्टोंबर 1943 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर येथे हंगामी सरकारची स्थापना केली.
• नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारला सुमारे 13 देशांनी मान्यता दिली.
• नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी उभ्या केलेल्या या आझाद हिंद फौजेने पुढे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाचे योगदान दिले.
पहिल्यांदा भारताच्या धर्तीवर तिरंगा फडकवला :
• दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी शाही सेनेनं 23 मार्च 1943 ला अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर कब्जा केला.
• त्यांनतर अंदमान निकोबार द्वीपसमूह आझाद हिंद सेनेच्या अंतरिम सरकारकडे सोपवण्याची घोषणा जपानच्या पंतप्रधानांनी , ६ नोव्हेंबर १९४३ ला टोक्योमध्ये ग्रेटर इस्ट एशियाटीक नेशन्सच्चया सभेत केली.
• त्यांनतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 29 ते 31 डिसेंबर 1943 दरम्यान अंदमान द्वीपसमूहाचा दौरा करत पहिल्यांदा भारताच्या धर्तीवर तिरंगा फडकवला.
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना ब्रिटिश राजवटीपासून मुक्त केलेले प्रदेश म्हणून घोषित केले.
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाला शहीद आणि निकोबार बेटाला स्वराज्य असे नाव दिले होते.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या काही प्रसिद्ध घोषणा :
• " तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा "
• " जय हिंद "