
चालू घडामोडी 21, जानेवारी 2025 | महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त कोण ? | Who is the new Election Commissioner of Maharashtra ?

महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त कोण ?
Who is the new Election Commissioner of Maharashtra ?
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र - निवडणूक आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, घटना दुरुस्ती
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. श्री गिरीशचंद्र मुर्मू
2. श्री दिनेश वाघमारे
3. श्री शक्तिकांता दास
4. श्री राजीव कुमार
उत्तर : श्री दिनेश वाघमारे
बातमी काय आहे ?
• जेष्ठ सनदी अधिकारी श्री दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल.

संविधानात 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे ?
सन 1992 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना कायदेशिर दर्जा देण्यासाठी, तसेच देशाच्या जडणघडणीत त्यांना योग्य ते स्थान देण्यासाठी भारतीय संविधानात 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात आली ?
या घटना दुरुस्तीअन्वये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीत व स्वच्छ, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी कलम 243-K आणि 243-ZA अंतर्गत स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी केली गेली.
भारतीय संविधानातील कलम 243-K कशाशी संबंधित आहे ?
(SSC CHSL 2022)
• भारतीय संविधानातील कलम 243-K पंचायतींच्या निवडणूकांशी संबंधित आहे.
• कलम 243-K नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
भारतीय राज्यघटनेचे कलम 243-ZA कशाशी संबंधित आहे ?
• भारतीय राज्यघटनेचे कलम 243-ZA नगरपालिकांच्या निवडणुकांशी संबंधित आहे.
• कलम 243-ZA नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
“स्थानिक स्वराज्य संस्था” म्हणजे काय ?
“स्थानिक स्वराज्य संस्थां” मध्ये नागरी भागातील महानगरपालीका, नगरपरिषदा व नगरपंचायती व ग्रामीण भागातील जिल्हापरिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीं या स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो.