
चालू घडामोडी 20, जानेवारी 2025 | राष्ट्रीय आपत्ती निवारण दल | National Disaster Response Force ( NDRF)

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल
National Disaster Response Force ( NDRF)
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण, भूगोल - आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1. 2000
2. 2006
3. 2010
4. 2012
उत्तर : 2006
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (NDRF) 20 वा स्थापना दिन सोहळा 19 जानेवारी 2025 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे झाला.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 19 जानेवारी 2006 रोजी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना करण्यात आली.
• राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा (2005) च्या प्रकरण 8 च्या कलम 44 अन्वये केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची स्थापना करण्यात आली.
• 2006 मध्ये स्थापन केल्यानंतर NDRF मध्ये 8 बटालियन होत्या.
• आज NDRF मध्ये 16 बटालियन आहे.
NDRF काय काम करते ?
• नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तींपासून जनतेचा शोध व बचाव करणे, आपत्तींचे शमन करणे, प्रतिबंध करणे, पूर्वतयारी करणे व प्रतिसाद देणे, वैद्यकीय प्रथमोपचार करणे हे काम NDRF करते.
• या शूर कार्यासाठी NDRF ला ‘आपत्तीमधील देवदूत’ (Angels In Disaster) म्हटले जाते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल प्रामुख्याने खालील आपत्तींमध्ये कार्य करते :
• भूकंप आणि कोसळलेल्या इमारती
• चक्रीवादळ, भूस्खलन, पूर, पाण्यातून बचाव करणे आणि इतर नैसर्गिक आपत्ती
• रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक आणीबाणी
उदाहरणार्थ :
• 2008 मध्ये कोसी नदी पूर
• 2010 मध्ये बेल्लारी इमारत कोसळणे
• 2023 मधील बालासोर, ओडिशा येथे रेल्वे अपघात
• केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड मधील भूस्खलन
• त्याचबरोबर जपान त्सूनामी (2011) आणि नेपाळ भूकंप (2015), तुर्की आणि उत्तर-पश्चिम सीरिया भूकंप (2023) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा वेगवान प्रतिसादासाठी जागतिक स्तरावर स्तूती करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) ब्रीदवाक्य (motto) कोणते ?
"आपदा सेवा सदैव सर्वत्र" हे NDRF चे ब्रीदवाक्य आहे.
"Aapda Seva Sadaiv Sarvatra"
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) वर्तमान महासंचालक कोण आहेत ?
श्री पीयूष आनंद, (IPS) हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) सध्याचे महासंचालक कोण आहेत
