
चालू घडामोडी 17, जानेवारी 2025 | राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस | National Startup Day 2025

राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस
National Startup Day 2025
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना, अर्थशास्त्र
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 22 जानेवारी
2. 16 जानेवारी
3. 2 जानेवारी
4. 9 जानेवारी
उत्तर : 16 जानेवारी
स्टार्टअप इंडिया केव्हा सुरू करण्यात आला ?
• स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो 16 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आला.
स्टार्टअप इंडिया म्हणजे काय ?
स्टार्टअप इंडिया सुरू कररण्याचे उद्दिष्ट कोणते ?
• एक मजबूत उद्योजकीय संस्कृतीला चालना देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
• स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करणे, प्रक्रिया सुलभ करणे, निधी (Funding) समर्थन प्रदान करणे आणि नविन कल्पना वाढवणे स्टार्टअप इंडियाचे उद्दिष्ट आहे.
स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे फायदे ?
• DPIIT द्वारे जानेवारी 2025 पर्यंत 1.59 लाखांहून अधिक स्टार्टअप्स ओळखले गेले.
• भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून स्थापना केली आहे.
• स्टार्टअप्सनी विविध क्षेत्रांमध्ये 16.6 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे रोजगारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
• किमान एक-महिला संचालक असलेले 73,151 स्टार्टअप्स असून उद्योजकतेतील महिलांचे सक्षमीकरण स्टार्टअप इंडिया उपक्रम दाखवतो.