
चालू घडामोडी 14, जानेवारी 2025 | कुंभवानी चॅनेलचे लोकार्पण | KUMBHVANI Channel
कुंभवानी चॅनेलचे लोकार्पण
KUMBHVANI Channel
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘कुंभवाणी’ या चॅनेलचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी
3. केंद्रीय मंत्री अमित शहा
4. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
कुंभवाणी’ या चॅनेल बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे (चॅनेलचे) उद्घाटन केले.
• या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कुंभ मंगल ध्वनी या कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.
कुंभवाणी चॅनेल :
• या चॅनेलचा प्रसारण कालावधी 10 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 असणार असून प्रसारण वेळ सकाळी 5:55 ते रात्री 10:05 पर्यंत असेल.
• यासाठी आकाशवाणीचे विशेष FM चॅनेल कुंभवाणी - 103.5 MHz ( मेगाहर्ट्झ ) आहे.
कुंभवाणी चॅनेल का सुरू करण्यात आला ?
• कुंभवानीद्वारे प्रसारित होणारा आँखो देखा हाल हे विशेषत: कुंभमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजला येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.
• यामुळे ऐतिहासिक महाकुंभाचे भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण देश व जगापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.
• देशाच्या सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारतीचा हा उपक्रम असुन हा उपक्रम भारतातील श्रद्धेच्या ऐतिहासिक परंपरेला चालना देणारा आहे.
• हा चॅनेल भाविकांना महत्त्वाची माहिती प्रदान करेल आणि त्यांना घरबसल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेण्यास सक्षम करेल.