
चालू घडामोडी 11, जानेवारी 2025 | कोणत्या राज्याने सुरू केली पार्थ योजना ? | Which State Launch PARTH Yojana ?

कोणत्या राज्याने सुरू केली पार्थ योजना ?
Which State Launch PARTH Yojana ?
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) तरुणांना भारतीय लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी खालील पैकी कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली ?
1. महाराष्ट्र
2. मध्य प्रदेश
3. गुजरात
4. राजस्थान
उत्तर : मध्य प्रदेश
पार्थ योजना काय आहे ?
पार्थ योजना कोणी सुरू केली ?
PARTH चा फूल फॅार्म Police Army Recruitment Training and Hunar असा आहे.
मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना सुरू केली आहे.
पार्थ योजना का सुरू करण्यात आली ?
पार्थ योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
• मध्य प्रदेश राज्यातील तरुणांना भारतीय लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे.
• राज्यातील तरुणांमध्ये देशभक्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे.
• तरुणांमध्ये मानसिक चपळता आणि व्यक्तिमत्व विकास वाढवणे.
पार्थ योजनेत कोणते प्रशिक्षण मिळेल ?
• पार्थ योजनेद्वारे तरुणांना शारीरिक कार्यक्षमता (शारीरिक चाचणी), लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
• तरूणांना विभागीय स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल.
• जिल्हा क्रीडा व युवक कल्याण अधिकारी हे प्रशिक्षण केंद्र ग्रामीण युवा समन्वयक आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवतील.
पार्थ योजना फ्री आहे का ?
नाही,
• पार्थ योजने अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना मासिक फी भरावी लागणार आहे.
• ही मासिक फी क्रीडा प्रशिक्षक कल्याण समितीच्या वतीने ठरविली जाईल.