
चालू घडामोडी 10, जानेवारी 2025 | जागतिक हिंदी दिवस | World Hindi Day

जागतिक हिंदी दिवस
World Hindi Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 1 जानेवारी
2. 6 जानेवारी
3. 10 जानेवारी
4. 12 जानेवारी
उत्तर : 10 जानेवारी
जागतिक हिंदी दिवस/ विश्व हिंदी दिवस का साजरी करतो ?
• हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी.
• जगभरातील शैक्षणिक संस्थांना हिंदी विषय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे.
• भारतीय भाषेबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि जगभरात तिला जागतिक भाषा म्हणून प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
• हिंदी भाषेचा वापर आणि संवर्धनाशी संबंधित जागरूकता पसरवण्यासाठी देखील हा दिवस साजरा करतात.
जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीलाच का साजरी करतात ?
• 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद पार पडली.
• या दिनाच्या सन्मानार्थ दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरी करण्यात येतो.
पहिला जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
10 जानेवारी 2006 मध्ये पहिल्यांदा जागतिक हिंदी दिवस साजरी करण्यात आला.
जागतिक हिंदी दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
“वैश्विक एकता और सांस्कृतिक गर्व की आवाज़ हिंदी” ही जागतिक हिंदी दिवस 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
या वर्षीची थीम जागतिक ऐक्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून हिंदीचा प्रचार करण्यावर भर देते.
नोट :
जागतिक हिंदी दिवस : 10 जानेवारी
राष्ट्रीय हिंदी दिवस : 14 सप्टेंबर
राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा असतो ?
14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदी भाषा देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली त्यामुळे 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करतात.