
चालू घडामोडी 08, जानेवारी 2025 | ISRO चे नवीन अध्यक्ष कोण ? | Who is the New Chairman of ISRO ?

ISRO चे नवीन अध्यक्ष कोण ?
Who is the new chairman of ISRO ?
Subject : GS - नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन अध्यक्ष म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. श्री व्ही. रामसुब्रमण्यम
2. श्री भुवनेश कुमार
3. श्री व्ही. नारायणन
4. श्री अनुराग गर्ग
उत्तर : श्री व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
• त्याचबरोबर डॉ. व्ही. नारायणन हे अवकाश विभागाचे (DoS) सचिव देखील असतील
• 14 जानेवारी 2025 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी डॉ. व्ही. नारायणन काम करतील.
• ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्ही. नारायणन यांना 40 वर्षांचा अनुभव असून ते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनमध्ये तज्ज्ञ आहेत.
नोट : इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस. सोमनाथ हे आहे. डॉ. व्ही. नारायणन 14 जानेवारी 2025 पासून इस्रोचे अध्यक्ष म्हणून त्यांची जागा घेतील.
इस्रो ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली.
• भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही देशाची राष्ट्रीय अवकाश संस्था आहे
इस्रोचे मुख्यालय कोठे आहे ?
ISRO मुख्यालय बेंगळुरू (कर्नाटक) येथील अंतरीक्ष भवन येथे आहे.