
चालू घडामोडी 07, जानेवारी 2025 | भारतीय मानक संस्था | Bureau of Indian Standards

भारतीय मानक संस्था
Bureau of Indian Standards
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय मानक संस्था (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ) ही एक वैधानिक संस्था आहे जी खालील पैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते ?
(SSC 2022)
1. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
2. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
3. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
4. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
उत्तर : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
(MINISTRY OF CONSUMER AFFAIRS, FOOD & PUBLIC DISTRIBUTION)
भारतीय मानक ब्युरो बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
भारतीय मानक संस्थेचा (BIS) स्थापना दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• अलीकडेच भारतीय मानक संस्था (BIS) ने 6 जानेवारी 2025 रोजी आपला 78 वा स्थापना दिवस साजरा केला.
• भारतीय मानक संस्था म्हणजे Bureau of Indian Standards (BIS)
भारतीय मानक संस्था (BIS) म्हणजे काय ?
जनतेला व्यावहारात लागणाऱ्या विविध वस्तू आणि उत्पादकांना लागणारा विविध कच्चा माल यथायोग्य गुणवत्तेचा ठरावा म्हणून आणि उत्पादित पदार्थ वापरण्यास समाधानकारक व्हावेत या दृष्टीने त्यांमध्ये कोणते गुणधर्म आवश्यक आहेत व ते किती प्रमाणात असले पाहिजेत ते ठरविणारी आणि या गुणधर्माचे मूल्यमापन करण्याच्या कसोट्या निश्चित करणारी केंद्रशासित भारतीय संस्था म्हणजे भारतीय मानक संस्था
भारतीय मानक संस्था (BIS) काय काम करते ?
• हे उत्पादन प्रमाणन - ISI मार्क
• सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग
• पर्यावरण-अनुकूल उत्पादनांच्या लेबलिंगच्या संदर्भात ECO मार्क योजना यांसारख्या विविध कार्यांसाठी जबाबदार आहे.
• 94% भारतीय मानके आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) आणि आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (IEC) मानकांशी सुसंगत आहेत.
• यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापार करणे अधिक सोपे आणि सोईस्कर झाले आहे.
भारतीय मानक संस्थेची (BIS) स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 6 जानेवारी 1947 रोजी भारतीय मानक संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली.
• BIS ही एक वैधानिक संस्था (Statutory Body) आहे.
भारतीय मानक संस्था (BIS) कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करते ?
(MINISTRY OF CONSUMER AFFAIRS, FOOD & PUBLIC DISTRIBUTION)
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
भारतीय मानक संस्थेचे (BIS) मुख्यालय कोठे आहे ?
नवी दिल्ली येथे भारतीय मानक संस्थेचे मुख्यालय आहे.
वैधानिक संस्था म्हणजे काय ?
वैधानिक संस्था म्हणजे संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्था आहेत, ज्यांचे अधिकार थेट संविधानातून न मिळता कायद्याद्वारे प्राप्त होतात.