
चालू घडामोडी 04, जानेवारी 2025 | जागतिक ब्रेल दिन | World Braille Day

जागतिक ब्रेल दिन
World Braille Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - शोध आणि शास्त्रज्ञ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1) 1 जानेवारी
2) 4 जानेवारी
3) 10 जानेवारी
4) 15 जानेवारी
उत्तर : 4 जानेवारी
जागतिक ब्रेल दिनाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ब्रेल लिपीचे जनक लुईस् ब्रेल यांचा जन्मदिन, 4 जानेवारी हा दिवस 'जागतिक ब्रेल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
• हा दिवस दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण, माहिती आणि संधींमध्ये प्रवेश करण्यासाठी, समाजात त्यांचा पूर्ण सहभाग वाढवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी लुईस् ब्रेल आणि त्यांनी विकसित केलेल्या ब्रेल लिपीचे महत्त्व अधोरेखित करतो.
जागतिक ब्रेल दिन पहिल्यांदा केव्हा साजरी करण्यात आला ?
4 जानेवारी 2019 रोजी प्रथमच जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला.
ब्रेल लिपी म्हणजे काय ?
• ब्रेल लिपी ही दृष्टिहीन लोकांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे.
• या लिपीमध्ये अंध व्यक्ती स्पर्शाने वाचू आणि लिहू शकतात.
• या लिपीमध्ये अंध व्यक्तींना कागदावर उंचावलेल्या बिंदूंच्या स्पर्शाने शिकवले जाते.
• ही लिपी इतर युरोपियन लिपींप्रमाणे डावीकडून उजवीकडे वाचली जाते.
• ब्रेल प्रणाली मध्ये 3×2 मॅट्रिक्समध्ये 6 उंचावलेली ठिपके वापरून वर्ण तयार केले जातात, जे त्यांच्या मांडणीद्वारे ओळखले जाऊ शकतात.
• ज्याप्रमाणे टंकलेखन यंत्राद्वारे पुस्तके लिहिली जातात, त्याचप्रमाणे ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी ब्रेलरायटरचा वापर केला जातो.

लुईस् ब्रेल कोण होते ?
लुईस् ब्रेल यांनी ब्रेल लिपी कशी विकसित केली ?
• ब्रेल लिपीचे जनक लुईस् ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समधील कुपर येथे झाला.
• लहानपणी एका अपघातामुळे लुईस् ब्रेल यांची दृष्टी गेली.
• वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पॅरिसमधील रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड युथची शिष्यवृत्ती मिळवली.
• 1821 मध्ये, फ्रेंच सैन्यातील कॅप्टन चार्ल्स बार्बियर यांनी लाईटचा वापर न करता अंधारात रणांगणावरील संदेश वाचू शकता येईल अशी प्रणाली विकसित केली होती.
• रात्रीच्या अंधारात वाचता येणारी लिपी अंधांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते असं लुईस ब्रेल यांना जाणवलं.
• त्यांनी बार्बियर यांची प्रणाली सुलभ करून थोडे बिंदू कमी केले.