जनरेशन बीटा म्हणजे काय ?
What is Generation Beta ?
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1 जानेवारी 2025 पासून जन्माला येणाऱ्या पिढीला खालील पैकी कोणते जनरेशन म्हणून ओळखले जाईल ?
1. मिलेनियल्स जनरेशन
2. जनरेशन बीटा
3. जनरेशन एक्स
4. जनरेशन Z (जेन झी)
उत्तर : जनरेशन बीटा (Generation Beta)
जनरेशन बीटा म्हणजे काय ?
2025 ते 2039 या वर्षांच्या कालावधीत जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन बीटा म्हणून ओळखले जाईल.
मार्क मॅकक्रिंडल यांच्या मते 2035 पर्यंत जगात जेन बीटाची एकूण संख्या १६ टक्के असेल.
कशी असेल जनरेशन बीटा ?
• जनरेशन बीटा ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशन दैनंदिन जीवनाचा नैसर्गिक भाग असलेल्या जगात वाढणारी पहिली पिढी असेल.
• बालपणी खेळायला AI आधारित खेळण्यांपासून पुढे शाळांमध्ये AI ट्युटरपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार आहे.
• या पिढीला पर्यावरणातील बदल, वेगाने होणारी लोकसंख्या वाढ, झपाट्याने होणारे शहरीकरण, मानसिक ताणतणाव अशा अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागेल.
• पर्यावरणीय बदलाविषयी जागरूकतेच्या काळात वाढवल्या जाणाऱ्या या पिढीसाठी शाश्वतता हा महत्त्वपूर्ण घटक असेल.
• पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग असतील असा समाजशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
पिढीचे (जनरेशनचे) नाव आणि वेळ -सीमा कशी ओळखली जाते ?
• समाज शास्त्रीयदृष्ट्या एका विशिष्ट कालखंडात जन्माला येणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला आपण पिढी म्हणून ओळखतो.
• साधारण समान कालखंडात जन्माला येणाऱ्या लोकांनी समान ऐतिहासिक घटना, एकसमान सांस्कृतिक प्रवाह तसेच सारखेच सामाजिक, तंत्रज्ञानविषयक बदल अनुभवलेले असतात.
• आर्थिक परिवर्तन, युद्ध, तंत्रज्ञानातील बदल आणि मीडिया साधारणतः 15 ते 20 वर्षांत हा बदल दिसून येतो.
• याचा परिणाम त्या पिढीच्या दृष्टिकोनावर आणि विचारसरणीवर होतो.
• यातून या प्रत्येक पिढीची एक विशिष्ट ओळख तयार होते.
उदाहरणार्थ :

ग्रेटेस्ट जेनरेशन ( The Greatest Generation) - 1901 ते 1927
• 1901 ते 1927 या कालवधीतली पिढी ही ‘ग्रेटेस्ट जेनरेशन’ म्हणून ओळखली गेली.
• या पिढीतल्या लोकांनी दोन्हीही विश्वयुद्ध बघितले आहे.
• या पिढीतल्या बहुतांश लोकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता.
• त्यांनी ग्रेट डिप्रेशन सारख्या आर्थिक संकटांचाही सामना केला.

द सायलेंट जनरेशन ( The Silent Generation) - 1928 ते 1945
1928 ते 1945 युद्धानंतरची मंदी आणि महागाईची झळ या पिढीने सोसली.
शांतपणे कार्य करत तंत्रज्ञान प्रगतीला गती दिली आणि आर्थिक समृद्धीचा पाया घातला.

बेबी बूमर्स जनरेशन (Baby Boomers) - 1946 ते 1964
• दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली या बदलामुळे १९४६ ते १९६४ या काळात जन्माला आलेल्या पिढीला ‘बेबी बूमर्स’ असे नाव देण्यात आले.
• या पिढीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, मूलभूत हक्क या अशा तत्त्वांचा पुरस्कार करत आधुनिकता स्वीकारली.
• रेडिओ आणि टीव्ही ही संपर्काची प्रमुख साधने होताना पाहिले.

जनरेशन एक्स (Generation X) - 1965 ते 1980
• या पिढीने अॅनालॉग ते डिजिटल हा टप्पा अनुभवला.
• कंप्युटर, व्हिडीओ गेम्स, फ्लॉपी डिस्क सीडी सारख्या तंत्रज्ञानाचा उदय होताना पाहिले आहे.
• स्वतंत्रता आणि नोकरीमध्ये संतुलन आणि व्यक्तिगत विकास यामध्ये संतुलन साधण्यासाठी धडपड.

जनरेशन Y (मिलेनियल्स) (Generation Millennials) - 1981 ते 1996
• इंटरनेटच्या युगात त्यांचे बालपण गेलं.
• इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्टफोनला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारणारी ही पहिली टेक्नो पिढी होती.
• सध्या तिशी आणि चाळिशीत असणारी ही मंडळी जगभरातल्या अर्थव्यवस्थांचा कणा आहेत.

जनरेशन Z (जेन झी) (Generation Z) - 1997 ते 2010
• डिजिटल युगात जन्माला येऊन वाढणारी पहिली पिढी म्हणजे जनरेशन झेड किंवा जेन झी.
• जेनझीजनी जगभरातली तरुणाई व्यापली आहे.
• सोशल मीडिया, शॉपिंग साइट यांचा भरभक्कम वापर करणारी पिढी.

जनरेशन अल्फा (Generation Alpha)- 2011 ते 2024
• संपूर्णपणे एकविसाव्या शतकात जन्मलेली पहिली पिढी म्हणजे जनरेशन अल्फा.
• बालपणी रडल्यावर समोर येणाऱ्या खुळखुळ्याऐवजी या पिढीच्या हातात मोबाइल्स आले.
• मोबाइल्स यांच्या शिक्षणाचा भाग झाले.
• यांचे जीवन इंटरनेट आणि सोशल मीडियावर जास्त अवलंबून आहे.
• आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनेपासून तर जागतिक घडामोडींपर्यंत जेन अल्फा व्यक्त होतात.
