
चालू घडामोडी 31, डिसेंबर 2024 | सूर्यकिरण लष्करी सराव | EXERCISE SURYA KIRAN

सूर्यकिरण लष्करी सराव
EXERCISE SURYA KIRAN
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सूर्यकिरण लष्करी सराव खालील पैकी कोणत्या देशांमधील संयुक्त नौदल सराव आहे ?
1) भारत आणि अमेरिका
2) भारत आणि नेपाळ
3) भारत आणि सिंगापूर
4) भारत आणि श्रीलंका
उत्तर : भारत आणि नेपाळ
भारताबरोबर चे लष्करी युद्ध सराव
• भारत आणि नेपाळ : सूर्य किरण
• भारत आणि अमेरिका : वज्र प्रहार, युद्ध अभ्यास
• भारत आणि सिंगापूर : बोल्ड कुरुक्षेत्र, अग्नी वॉरियर
• भारत आणि श्रीलंका : मित्र शक्ती
• भारत आणि इंडोनेशिया : गरुड शक्ती
• भारत आणि चीन : हॅंड-इन-हॅंड
• भारत आणि रशिया : इंद्र
सूर्यकिरण सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
भारत-नेपाळ दरम्यानच्या 18 वा सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ होत आहे.
सूर्यकिरण सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
• हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
• सूर्यकिरण लष्करी सराव दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात.
सूर्यकिरण लष्करी सरावात सहभागी युनिट्स :
• भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे.
• नेपाळच्या पथकाचे नेतृत्व श्रीजुंग बटालियनकडे आहे.
सूर्यकिरण लष्करी सरावाचे उद्दीष्ट काय ?
• जंगलातील युद्धकौशल्य, पर्वतीय प्रदेशातील दहशातवादविरोधी कारवाया आणि आपत्ती काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केली जाणारी मदत यामध्ये संयुक्त कार्यक्षमता बळकट करणे हे सूर्यकिरण सराव आयोजनाचे उद्दीष्ट आहे.
• या सरावामुळे, दोन्ही देशांतील व्यावसायिक सहकार्य, मैत्रीपूर्ण संबंध आणि विश्वास तसंच सांस्कृतिक संबंधांचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.
सूर्यकिरण लष्करी सरावाची सुरुवात केव्हा झाली ?
सूर्य किरण या भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाची सुरुवात 2011 मध्ये झाली.