
चालू घडामोडी 30, डिसेंबर 2024 | 2024 FIDE महिलांची जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोण जिंकल ?

2024 FIDE महिलांची जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोण जिंकल ?
FIDE World Rapid Chess Championships 2024
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 FIDE महिलांची जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा (वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप) खालील पैकी कोणी जिंकली ?
1. हरिका द्रोणावल्ली
2. कोनेरू हम्पी
3. वैशाली रमेशबाबू
4. स्मृती मंधाना
उत्तर : कोनेरू हम्पी (Koneru Humpy)
बातमी काय आहे ?
2024 FIDE महिलांची वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी यांचा विजय

2024 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताच्या कोनेरू हम्पी यांनी इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरचा पराभव करत ऐतिहासिक दुसऱ्यांदा महिलांच्या जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
• कोनेरू हम्पीने 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले होते.
2024 FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली ?
• 26-29 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहर, येथे आयोजित करण्यात आली होती.
वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप काय आहे ?
वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप ही एक बुद्धिबळ स्पर्धा आहे जी वेळेच्या नियंत्रणाखाली वेगाने खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळातील विश्वविजेते ठरवण्यासाठी आयोजित केली जाते.
जागतिक चेस चॅम्पियनशिपचे प्रकार :
FIDE, जागतिक बुद्धिबळ महासंघ, दरवर्षी वैयक्तिक बुद्धिबळ प्रकारांमध्ये 3 प्रकारच्या जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन करते :
1. पारंपरिक (Classical)
2. जलद (Rapid)
3. अतिजलद (Blitz)
रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये फरक काय ?
जलद (Rapid) : रॅपिडमध्ये 15-मिनिटांच्या वेळेच्या नियंत्रणामध्ये खेळलेले गेम दिसतील, ज्यामध्ये खेळाडूंना प्रति चाल (पहिल्या चालीपासूनच) अतिरिक्त 10-सेकंद वाढ मिळेल.
जलद (Rapid) चेस चॅम्पियनशिप भारतीय विजेते :
• 2017 मध्ये रियाध, सौदी अरेबिया येथे झालेल्या खुल्या गटात श्री विश्वनाथन आनंद यांनी जागतिक जलद (Rapid) विजेतेपद पटकावले होते.
• कोनेरू हम्पी यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोनदा जलद विजेतेपद पटकावले आहे.
अतिजलद (Blitz) :
• ब्लिट्झ ही अतिजलद स्पर्धा असते त्यात 3 मिनिटांच्या वेळेच्या नियंत्रणासह आणि प्रत्येक चाल 2-सेकंद वाढीसह (पहिल्या चालीपासूनच) वेळ मिळतो.
• ब्लिट्ज फॉरमॅटमध्ये आजवर कोणत्याही भारतीयाला विजेतेपद मिळालेले नाही.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (International Chess Federation) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ही बुद्धिबळ खेळाची प्रशासकीय संस्था आहे आणि जगभरातील अनेक राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघांना जोडते.
• आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ त्याच्या फिडे (FIDE) या फ्रेंच नावाने प्रसिद्ध आहे.
• बुद्धिबळाशी संबंधित सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे.
• स्थापना : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924 रोजी पॅरिसमध्ये झाली.
• मुख्यालय : त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने (Lausanne) शहरात आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन केव्हा साजरी करतात ?
20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.