
चालू घडामोडी 26, डिसेंबर 2024 | भारतीय माजी न्यायाधीश संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष

भारतीय माजी न्यायाधीश संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष
Chairperson of the United Nations Internal Justice Council
Subject : GS- नियुक्ती, जागतिक संघटना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच खालील पैकी कोणाची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. न्यायमूर्ती मदन लोकूर
2. न्यायमूर्ती विक्रम नाथ
3. न्यायमूर्ती संजीव खन्ना
4. न्यायमूर्ती भूषण गवई
उत्तर : न्यायमूर्ती मदन लोकूर (Justice Madan Bhimarao Lokur)
बातमी काय आहे ?
• सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती मदन भीमराव लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती मदन लोकूर यांचा कार्यकाळ 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत असेल.

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• न्यायमूर्ती लोकूर यांचा जन्म 1953 मध्ये झाला.
• जून 2012 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि डिसेंबर 2018 मध्ये ते निवृत्त झाले.
• 2019 मध्ये, न्यायमूर्ती लोकूर यांची फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली.
• दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सेवा देणारे ते पहिले भारतीय न्यायाधीश ठरले.
संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(United Nations Internal Justice Council)
• न्याय व्यवस्थेचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने अंतर्गत न्याय परिषदेची (Internal Justice Council) स्थापना केली.
• संयुक्त राष्ट्रांच्या न्याय व्यवस्थेच्या प्रशासनामध्ये स्वातंत्र्य, व्यावसायिकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे हे या परिषदेचे ध्येय आहे.
• या परिषदेत 5 सदस्य असतात.