
चालू घडामोडी 24, डिसेंबर 2024 | राष्ट्रीय ग्राहक दिन | National Consumer Day

राष्ट्रीय ग्राहक दिन
National Consumer Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र - कायदे
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरी करतात ? (SSC GD डिसेंबर 2021)
1. 5 सप्टेंबर
2. 22 नोव्हेंबर
3. 1 डिसेंबर
4. 24 डिसेंबर
उत्तर : 24 डिसेंबर
राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• राष्ट्रीय ग्राहक दिन भारतात दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
• 24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरी करतात ?
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरी करण्याचा उद्देश काय आहे ?
• ग्राहकांना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी.
• ग्राहकांना माहिती आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने " जागो ग्राहक जागो " कार्यक्रमही सुरू केला आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 का लागू करण्यात आला ?
• विशेषत: जागतिकीकरण, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स मार्केट इत्यादींच्या नवीन युगात ग्राहक संरक्षणासाठीच्या तरतुदी अधिक मजबूत करण्यासाठी, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या जागी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 लागू करण्यात आला.
• सदोष वस्तू, निष्काळजी सेवा आणि अनुचित व्यापार पद्धतींपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
ग्राहकांसाठी कोण कोणत्या संस्था आहेत ?
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली.
तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी -
• केंद्रीय स्तरावर : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग
• राज्य स्तरावर : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
• जिल्हा स्तरावर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचे हक्क कोणते ?
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत.
1. सुरक्षेचा हक्क (Right to security)
2. माहितीचा हक्क (Right to Information)
3. निवड करण्याचा अधिकार (Right to choose)
4. म्हणणे मांडण्याचा हक्क (Right to have a say)
5. तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क (Right to grievance and redressal)
6. ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार (Right to education of consumer rights)
जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा साजरी करतात ?
(World Consumer Rights Day)
• 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरी करतात.